विवेकानंद महाविद्यालयात महावृक्ष लागवड मोहीम मोठ्या उत्साहात संपन्न

छत्रपती संभाजीनगर : विवेकानंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या प्रांगणात महावृक्ष लागवड मोहीम संपन्न झाली. यावेळी मोहिमेच्या शुभारंभासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डी आर शेंगुळे उपस्थित होते. याची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी “एक पेड मा के नाम” Plant 4mother अंतर्गत प्रत्येकी तीन वृक्ष लावून केली.

Advertisement

याप्रसंगी उपप्राचार्य टी आर पाटील, उपप्राचार्य अरुणा पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ सोमनाथ वांजरवाडे, डॉ वसंत नीरस, डॉ अप्पाराव वागडव डॉ शर्मिष्ठा ठाकूर, डॉ इंगळे, डॉ सोरमारे, प्राध्यापक कातबने उपस्थित होते. याप्रसंगी माननीय प्राचार्यांनी वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धन या विषयावर स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page