गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जाणले पर्यावरणाचे महत्त्व

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या आदर्श पदवी महाविद्यालय, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय जागरूकता वाढविण्यासाठी दि 24 ऑगस्ट 2024 रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ कृष्णा कारू, प्रमुख मार्गदर्शक म्हणून रसायनशास्त्र विभाग प्रमुख डाॅ प्रशांत ठाकरे, संजय बन्सोड, समन्वयक भरत घेर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कृष्णा कारू मार्गदर्शन करतांना म्हणाले, दिवसें दिवस मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. नष्ट होत चाललेल्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी झाडे लावून झाडांचे संगोपन करायला हवे. तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती जागरूकता सोबतच पर्यावरणाचे महत्त्व यावर प्राचार्य डॉ कृष्णा कारू यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

Advertisement

प्रमुख मार्गदर्शक डाॅ प्रशांत ठाकरे यांनी, मानवी जीवनातील अत्यावश्यक घटक असलेल्या हायड्रोजन आणि प्रदूषणरहित ऑक्सिजन शाश्वत स्वरूपात मिळवण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवले पाहिजे. पर्यावरण नष्ट होत गेल्यास भविष्यात पृथ्वीवर निर्माण होणाऱ्या समस्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्त्व आणि संवर्धन यावर आधारित पत्रके, पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती केली. महाविद्यालय परिसरात वृक्षलागवड करून वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी वचनबद्धता दर्शविली. सदर उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्त्व जाणले.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रा प्रीती भांडेकर, प्रा सुदर्शन जानकी, प्रा आश्विन आंबेकर, प्रा रेणुका गव्हारे, प्रा प्राजक्ता घोटेकर, प्रा गौतमी शहारे, प्रा प्रवीण कांबळे, प्रा मंगेश आणि सह-समन्वयक यांनी कार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page