स्वावलंबी भारत अभियान आणि सोलापूर विद्यापीठतर्फे आयोजित प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

उद्योजकता आणि नाविण्यातेची सांगड घालावी – डॉ. दामा

सोलापूर : स्वावलंबी भारत अभियान सोलापूर, DeAsara फाऊंडेशन पुणे आणि उद्यम इनक्युबेशन केंद्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रेन द ट्रेनर या प्रशिक्षण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन विद्यापीठाच्या आवारात  करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी सर्व प्रशिक्षणार्थींचे स्वागत केले आणि विद्यापीठामार्फत होऊ घातलेल्या या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये उद्योजकता आणि नाविन्यतेची सांगड घालण्याची आवाहन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दे आसरा फाउंडेशनच्या मनीषा तपस्वी उपस्थित होत्या, ज्यांनी सर्व सहभगिंना मार्गदर्शन केले ज्यामध्ये विविध ॲक्टिव्हिटीचा समावेश होता.

Advertisement

याप्रसंगी विद्यापीठाचे IIL चे संचालक प्रो. डॉ. विकास बी. पाटील, स्वावलंबी भारत अभियान चे जिल्हा समन्वयक विनायक बुंकापुर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, ज्ञानेश्वर जाधव यांनी आभार मानले तर अधिसभा सदस्य चन्नवीर बंकुर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, यावेळी मयांक चौहान, शरद मदने, जगदीश भुतडा, उद्यम incubation केंद्राचे व्यवस्थापक श्रीनिवास पाटील, अश्रुबा वाघमारे सर यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी 35 पेक्षा जास्त प्रशिक्षकांनी प्रशिक्षण घेतले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page