राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात घेतली लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ 

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आयोजन 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात आली. राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने शपथ कार्यक्रम जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात पार पडला.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने शपथ दिली. वयाचे १८ वर्षे पूर्ण केलेला नव तरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवणे या उद्देशाने दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे.

Advertisement

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून या दिवशी सर्व मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली जाते. तथापि २५ जानेवारी २०२५ रोजी शनिवार शासकीय सुट्टीचा दिवस असल्यामुळे दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात यावी, असे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. या दिवसाच्या अनुषंगाने विद्यापीठात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपकुलसचिव डॉ रमन मदने, उमेश उईके, प्रभारी उपकुलसचिव गणेश कुमकुमवार, अधीक्षक शैलेश राठोड, अधीक्षक राकेश कोपुलवार, कुलगुरूंचे स्वीय सहाय्यक नितीन खरबडे यांच्यासह अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page