स्वायत्त महाविद्यालयामध्ये काळानुरूप अभ्यासक्रम व परिक्षा मुल्याकंन पायाभुत – डॉ. वैशाली दिवाकर
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयाची स्वायत्ततेकडे वाटचाल सुरू आहे या निमीत्ताने देवगिरी महाविद्यालयात सेंट मिरा कॉलेज ऑफ गर्ल्स, पुणे येथिल प्राध्यापिका डॉ. वैशाली दिवाकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. सेंट मिरा कॉलेज ऑफ गर्ल्स, पुणे हे महाविद्यालय गत सोळा वर्षापासुन स्वायत्त दर्जा अंतर्गत कार्य करत आहे. या संदर्भाने डॉ. वैशाली दिवाकर यांनी स्वायत्त महाविद्यालय प्रत्यक्ष प्रशासन कार्यवाही, प्रशासन संरचना, काळानुरूप बहुउद्देशिय अभ्यासक्रम व परिक्षा मुल्याकंन पध्दती आदी बाबीवर सविस्तर मार्गदर्शन केले.
काळानुरूप अभ्यासक्रम रचना, अभ्यासक्रम रचनेमध्ये विद्यार्थ्यांची भुमिका व अभ्यासक्रमावावत विद्यार्थ्याचा अभिप्राय महत्वाचा आहे तसेच अध्ययन अनुभुती, अध्ययन परिणाम याची सातत्याने मोजमाप केले पाहीजे तसेच लेखी व तोंडी परिक्षेद्वारे सातत्यपूर्ण मुल्यांकन झाले पाहिजे त्यासाठी आपल्या परिक्षा पध्दतीमध्ये आवश्यक ते बदल व सुधारणा केली पाहीजे. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर होते. नवीन शैक्षणिक धोरण 2020 व देवगिरी महाविद्यालयाची स्वायतत्कडे वाटचाल या संदर्भात आपली भुमिका विषद केली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार यांनी केले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. अनिल आर्दड, डॉ अपर्णा तावरे महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती.