योगशास्त्रात सखोल संशोधन होणे काळाची गरज – डॉ अंकुश गिरी
अमरावती : योगशास्त्राचा अभ्यास करतांना संशोधन पद्धतीला अधिक महत्व असते. जीवनाचा लेखाजोखा मांडतांना ज्या गोष्टीची गरज असते, तसेच संशोधनात सांख्यिकीय लेखाजोखाला महत्व आहे, असे विचार महिला महाविद्यालय, अमरावतीचे डॉ अंकुश गिरी यांनी मांडले.
संशोधन विषयावर मार्गदर्शन करतांना डेटा संकलित करणे, सांखिकी विश्लेषण यावर विस्तृत माहिती दिली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार संशोधन सर्वांसाठी अनिवार्य असल्यामुळे त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना पी एच डी पर्यंत कसा होईल, याविषयी देखील त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच योगशास्त्रातील संशोधनामधील सांखिकी म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचे प्रकार, चल, संशोधनामध्ये माहिती कशी संकलीत करावी, प्राथमिक व द्वितीय स्त्रोत म्हणजे काय आदींबाबत विद्यार्थ्यांना उदाहरणाव्दारे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा स्वप्नील मोरे व आभार प्रा प्रफुल्ल गंजारे यांनी मानले. प्रा अश्विनी राऊत, प्रा राधिका खडगे प्रा आदित्य पुंड, प्रा अनघा देशमुख, प्रा स्वप्निल ईखार, प्रा स्वाती धनस्कर, प्रा पुजा म्हस्के, प्रा शिल्पा देव्हारे, प्रा राहुल दोडके यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.