कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यापीठस्तरीय अविष्कार–२०२५ उत्साहात सुरू

अविष्कारमधून तरुणांच्या भविष्याचा आरसा दिसतो – प्रा. प्रशांत बोकारे

जळगाव | दि. ३० डिसेंबर २०२५ : संशोधनासारख्या स्पर्धांमधून तरुणाईच्या भविष्याचा स्पष्ट प्रतिबिंब दिसून येतो आणि अविष्कार स्पर्धेमुळे तरुणांच्या विचारांना निश्चितच चालना मिळेल, असा आशावाद गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केला.

ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित विद्यापीठस्तरीय अविष्कार–२०२५ (दुसरा टप्पा) या संशोधन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी होते

The university-level Avishkar-2025 event has begun enthusiastically at Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University.

🎓 मान्यवरांची उपस्थिती

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून

  • प्रा. विलास सपकाळ, कुलगुरू, एमजीएम विद्यापीठ, छ. संभाजीनगर
  • प्रा. एस. टी. इंगळे, प्र-कुलगुरू
  • व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. जयदीप साळी
  • अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे
  • अधिसभा सदस्य डॉ. विशाल पराते, वैशाली वराडे, डॉ. एस. आर. पाटील
  • कुलसचिव डॉ. विनोद पाटील
  • सीए रवींद्र पाटील
  • अविष्कार सचिव डॉ. जयेंद्र लेकुरवाळे
  • समन्वयक डॉ. नवीन दंदी, सहसमन्वयक डॉ. अमरदीप पाटील

यांची उपस्थिती लाभली.


The university-level Avishkar-2025 event has begun enthusiastically at Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University.

🔬 संशोधनातूनच समस्यांचे निराकरण – प्रा. बोकारे

प्रा. प्रशांत बोकारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशातील आणि समाजातील समस्या सोडवण्यासाठी गंभीर आणि मौलिक संशोधन आवश्यक आहे.
आजची तरुण पिढी केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) नव्हे तर त्याही पुढील विचार करत आहे. देशाची समृद्धी टिकवण्यासाठी भारतीय बनावटी वस्तूंचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी कॉपी-पेस्ट संस्कृती टाळून मूळ संकल्पनांवर आधारित संशोधन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


🌍 जागतिक संधींचा उपयोग गरजेचा – प्रा. विलास सपकाळ

एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विलास सपकाळ म्हणाले की,
आज संशोधन क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध आहेत. संशोधन हे आपल्या गरजांवर आधारित, कमी इनपुट आणि जास्त आउटपुट देणारे असावे.
आंतरविद्याशाखीय अभ्यास केल्यास संशोधन अधिक दर्जेदार होईल, असेही त्यांनी नमूद केले.


The university-level Avishkar-2025 event has begun enthusiastically at Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University.

🧠 संशोधनासाठी धैर्य, चिकाटी आणि जिज्ञासा आवश्यक – प्रा. माहेश्वरी

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी सांगितले की,
संशोधकाकडे धैर्य, चिकाटी आणि तीव्र आवड असणे आवश्यक आहे.
अविष्कारसारख्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना विद्यापीठ, राज्य व देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळते.


📊 ५२८ संशोधक, ३३८ प्रवेशिका – नवसंशोधनांचा अविष्कार

दुसऱ्या टप्प्यातील अविष्कार–२०२५ स्पर्धेत

  • ५२८ संशोधक विद्यार्थी
  • ३३८ प्रवेशिका
  • ३०४ पोस्टर्स व ३४ मॉडेल्स

यांचे सादरीकरण करण्यात आले.

मॉडेल्समध्ये:
सौरऊर्जा सायकल, ईव्ही चार्जिंग सिस्टीम, ऑक्सिजन जनरेटर, स्मार्ट ॲग्रो गार्ड, ग्रीन सोल्युशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्मार्ट कार पार्किंग इ.

पोस्टर विषय:
केळीवर आधारित न्युडल्स, औषध कचऱ्याचे पुनर्वापर, डिजिटल डिटॉक्स, स्मार्ट बसभाडे प्रणाली, ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतीचे अर्थशास्त्र, स्मार्ट प्लास्टिक बॉटल क्रशर, भारतीय प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आदी.


🎭 सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली सायंकाळ

सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात लोकगीत, भावगीत व नृत्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.


🏆 आज समारोप व पारितोषिक वितरण

अविष्कार–२०२५ स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ
दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.४५ वाजता होणार आहे.
अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य अनिल राव उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com