कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा द्वादश दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

संस्कृत शैक्षणिक संस्थांचे जागतिक नेटवर्क तयार करावे – राज्यपाल रमेश बैस

कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने पहिल्या 10 विद्यापीठांमध्ये आपले स्थान निर्माण करावे – राज्यपाल रमेश बैस

संस्कृत भाषा जनभाषा करण्यासाठी सरल परंतु प्रमाण संस्कृतचा प्रचार व प्रसार आवश्यक – प्रो. प्रहलाद जोशी

रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा द्वादश दीक्षांत समारंभ आज बुधवार, दि. 6 मार्च 2024 रोजी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक येथे संपन्न झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विश्वविद्यालयाचे कुलपती रमेश बैस हे दीक्षांत समारोहाच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यपाल आभासी माध्यमातून उपस्थित होते. कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या यजमानत्वाखाली संपन्न झालेल्या या समारोहात विशिष्ट अतिथी या नात्याने प्रो प्रल्हाद जोशी, कुलगुरू, कुमार भास्कर वर्मा संस्कृत व पुरातनाध्ययन विश्वविद्यालय, नालबारी, आसाम उपस्थित होते. विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, परीक्षा नियंत्रक डॉ. जयवंत चौधरी, व्यवस्थापन परिषद, विद्वत् परिषदेचे सदस्य, सर्व संकायांचे अधिष्ठाता आणि पदकदान- दाते याप्रसंगी विशेषत्वाने उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रगीताने झाला. विश्वविद्यालयाच्या वतीने दीक्षांत समारोहाचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रो. प्रसाद गोखले यांनी राज्यपाल व विश्वविद्यालयाचे कुलपती रमेश बैस यांचे स्वागत व सत्कार केला.

विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी आपल्या स्वागतपर भाषणात विश्वविद्यालयाचा विकास व प्रगतीविषयक अहवाल सादर केला. विश्वविद्यालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पूर्णपणे अंगिकार केला असून, भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित अभ्यासकमांचे परिचालनही केले आहे. विश्वविद्यालयाचे लक्ष्य आता वारंगा येथे आंतरराष्ट्रीय केंद्र लवकरात लवकर परिचालित व्हावे हेच आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक कराराद्वारे अनेकानेक आंतरशाखीय संशोधन व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विश्वविद्यालयाच्या विकासात राज्यपाल सातत्यपूर्ण मार्गदर्शन तसेच महाराष्ट्र शासनासह सर्वांचे सहकार्य लाभत आहे त्यासाठी मी सर्वाचा ऋणी आहे.

या दीक्षांत समारोहात विश्वविद्यालयाचे कुलपती रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांना दीक्षांतोपदेश प्रदान केला. 2551 पदव्युत्तर पदवी, 5356 पदवी, 1992 पदविका, 236 पदव्युत्तर पदविका, व 226 प्रमाणपत्रासह मुक्त स्वाध्यायपीठम् द्वारा 207 पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र अशी एकूण 10583 पदवी प्रमाणपत्रे प्रदान केली.

राज्यपाल व विश्वविद्यालयाचे कुलपती रमेश बैस यांनी आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले.

राज्यपाल महोदयांनी प्रारंभी सर्व पदवी तसेच पीएच्.डी आणि डी.लिट्. प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आपल्या भाषणात राज्यपाल महोदय म्हणाले, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने देशातील सर्वोत्कृष्ट संस्कृत विद्यापीठांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाने यापूर्वीच पावले उचलली असून, त्यासाठी कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी आमच्या अभिनंदनास पात्र आहेत. विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्र वारंगा येथे विकसित होत असून हे केंद्र ‘उत्कृष्ट केंद्र’ म्हणून उदयास येईल आणि जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करेल. भारताचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे संस्कृतशिवाय शक्य नाही. संस्कृत ही भाषांची जननी आहे.

स्वातंत्र्याच्या या अमृत कालखंडात आपला संकल्प असा असावा की सन 2047 पर्यंत देववाणी संस्कृत ही देशातील पहिली पसंतीची भाषा व्हावी. योग आणि आयुर्वेदाप्रमाणेच जगात संस्कृतबद्दलही आकर्षण निर्माण झाले आहे. जर्मनीच्या गोथे इन्स्टिट्यूट किंवा मॅक्स मुलर भवन्स प्रमाणे लिखित आणि बोलल्या जाणा-या संस्कृतमध्ये अल्पकालीन कार्यक्रम देण्यासाठी संस्कृत शैक्षणिक संस्थांचे जागतिक नेटवर्क तयार करणे आवश्यक आहे. अनेक अमेरिकन विद्यापीठे आपल्या विद्यापीठांसोबत शैक्षणिक आणि संशोधन देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक आहेत.

Advertisement

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यापीठांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देते. यासाठी मी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या विदेशातील उत्तमोत्तम विद्यापीठांशी सामंजस्य करार करून शैक्षणिक आदान-प्रदान करण्याचे आवाहन करतो; या करारांमुळे संस्कृतच्या विद्यार्थ्यांना देखील आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा अनुभव मिळेल. विकसित भारताचे लक्ष्य विचारात घेवून, कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने पहिल्या 10 विद्यापीठांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच आंतरशाखीय संशोधनास प्रोत्साहन दयावे आणि भारत व विदेशातील संस्कृत विद्वानांना विद्यापीठाशी जोडावे. संस्कृत मधील करिअरचे विविध आयाम खुले करून दयावे असे आवाहनही मा. राज्यपालमहोदयांनी केले.

या दीक्षांत समारोहात 2021-22 व 2022-23 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी, विशिष्ट अतिथी प्रो. प्रह्लाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत 35 हून अधिक विषयांमध्ये 87 सुवर्ण पदकांसह 25 रोख पारितोषिके देखील या दीक्षांत समारोहात प्रदान करण्यात आली. तसेच याप्रसंगी 1 संशोधनपर विद्यावाचस्पती (डी.लिट्) तसेच 14 विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखा अंतर्गत विद्यावारिधी (पीएच. डी.) पदवीने गौरवान्वित करण्यात आले.

दीक्षांत समारोह महत्त्वपूर्ण उपलब्धी

  • संशोधनपर विद्यावाचस्पती डी. लिट्. उपाधी डॉ. अनोमा साखरे यांना “Study Of Buddhist Iconography And Temple Architecture As An Illustrating Expression Of Buddhism In Its Proliferation In Theravadin Buddhist Countries” या संशोधनाकरिता विद्यावाचस्पती अर्थात् डी. लिट्. उपाधीने सन्मानित करण्यात आले
  • सर्वाधिक पदके – एम.ए. आचार्य (संस्कृत) विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल तसेच आणि सर्व विद्याशाखांमधून सर्वप्रथम आल्याबददल कु. श्रुती अजय शर्मा (2021-22), कु. राधा मुकंद देशकर (2022-23) या विद्यार्थिनीला सर्वाधिक पदके – 7 सुवर्ण पदके तसेच 1 रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
  • मा. कुलपती सुवर्णपदक – मा. राज्यपाल आणि विश्वविद्यालयाचे कुलपती

यांच्याद्वारे देण्यात येणारे कुलपती सुवर्णपदक आचार्य (एम्. ए). (दर्शन) मध्ये सर्वाधिक गुण अर्थात् प्रथम कमांक प्राप्त केलेल्या आकांक्षा सुनील पांडे (21-22) श्रुतिका संतोष बडगे (22-23) यांना प्रदान करण्यात आले.
दीक्षांत समारोह राजीवरंजन मिश्रा, विभाग प्रमुख, तांत्रिक विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रथम स्थान प्राप्त गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे

  • सर्वेश गणेश जोशी (22-23) या विद्यार्थ्याला एम्.ए. (वेद) (गुरुकुलम्) मध्ये, वैदेही मनोज गायकी (21-22) व तृप्ती विजय काशीकर (22-23) (व्याकरण) (गुरुकुलम्) मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबददल तसेच 2021-22 व 2022-23 करिता अनुकमे एम्.ए. (योगशास्त्रामध्ये) अनिता अँथोनी आल्वा, मनोजा देवदत्त पाटील, एम्.पी. ए. (नृत्यशास्त्रामध्ये) मृणालिनी दिनेश शाह, उष्मी अमित दोशी, एम्.ए संस्कृत (बहुशाखीय मध्ये) दीपाली अशोक पांडे, सिद्धी अभय वैद्य, एम्.एस्सी. (योगिक सायन्स मध्ये) आंचल योगेश भोजवानी, अंजली संजय दत्ता, एम्.ए. (ज्योतिर्विज्ञान मध्ये ) दिपाली आनंद देशपांडे, चित्रा नीलेश पाटकर, एम्.ए (ज्योतिष मध्ये) कौशल गिरीश जोशी या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे प्रथम आल्याबद्दल पदक व पारितोषिके प्रदान करण्यात आले.
  • (सत्र 2021-22 व 2022-23 ची नावे अनुकमे) बी.ए. (विशारद) मध्ये संतोष दुर्गादास गोसावी, बी.ए. (योगशास्त्र) मध्ये दीपशिखा, अरुणकुमार अंकीत बी.ए. (कीर्तनशास्त्र) मध्ये रूपाली विजयकुमार घैसास, श्रीराम अशोक काटकर, बी. ए. (नृत्यशास्त्र) मध्ये श्रीकांत कृष्णराव धबडगावकर, वैष्णवी रघुनाथ जोशी, बी.एफ्.ए. (उपयोजित कला) मध्ये मुस्कान दीपक गोजे, सिद्धान्त सुनील मालुसरे, बी. ए. (वेदांग ज्योतिष) मध्ये आशाज्वाला रमेश नाईक, उमेश बालाजीराव पाध्ये, बी.ए. (सिव्हील सर्व्हिसेस) मध्ये अलिशा भोला खोब्रागडे, तेजस्विनी गिरीश तळपल्लीकर, बी.ए. (सिव्हील सर्व्हिसेस) (मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम) सुनियोजित सुधीर रामटेके, बी.एस्सी. (हॉस्पिटॅलिटी स्टडीज्) मध्ये प्रसनजित प्राणकिशन पाल यांना पदके व पारितोषिके प्रदान करण्यात आली.

सत्र 2021-22 व 2022-23 करिता अनुकमे करिता बी. एड्. शिक्षाशास्त्री पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबददल हर्षल उद्धवकुमार तडस व किसन रामदास पाटील तसेच मुलींमधून प्रथम कमांक प्राप्त केल्याबददल पल्लवी बळवंत ठाकरे व स्वाती प्रकाश नास्कोलवार आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम कमांक प्राप्त केल्याबददल मयुरी देवानंद टेंभुर्णे व पल्लवी अनिल कोटकर यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

  • एम्.एड्. शिक्षाशास्त्री पारंगत पदव्युत्तर पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल प्रिया सुनील बुरंगे, श्रुतिका ज्ञानेश्वर बावनकर यांना अनुकमे 21-22 व 22-23 करिता सुवर्णपदक प्रदान करण्यात आले
  • मुक्तस्वाध्यायपीठम् Open & Distance Learning Centre द्वारे परिचालित एम्.ए. (संस्कृत) विषयात सर्वाधिक गुण प्राप्त पल्लवी सुरेश शेळके आणि एम्.ए. (योगशास्त्र) परीक्षेत वनिता मारुती मगदूम यांना 2021-22 करिता कुलगुरू पदक प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page