महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेचा दुसरा टप्पा दि ०२ डिसेंबर पासून
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र-2024 च्या दुसऱ्या टप्यातील लेखी परीक्षेचे संचलन दि. 02 डिसेंबर ते 02 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र राज्यातील एकूण 100 परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहे.
सदर परीक्षेस विविध पदवी/पदव्यूत्तर / विद्यापीठ संचलित अभ्यासक्रमांचे (UG Courses: II, III (I), III (II) Year MBBS (OLD), II Year MBBS (2019), II, III, IV Year BDS, Basic B.Sc. Nursing & P. B. B. Sc. All Years. PG Courses: PG Medical MD/MS/DM/M.Ch/PG Diploma/M.Sc. Medical (Biochemistry & Microbiology) University Courses: MPH and M.Phil.) परीक्षा संपन्न होणार आहेत.
यामध्ये एकूण अंदाजे 30,902 विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रविष्ठ होणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले.