योगातील सूक्ष्म व्यायामांची परिणती माणसाच्या जीवनाला अधोरेखित करते – डॉ सूर्यकांत पाटील
अमरावती : मानवी जीवनात औषधापेक्षा योगा आणि व्यायामाला अधिक महत्व असावे. औषध ही तत्कालीन असतात, तर योग आणि व्यायाम ही माणसाच्या जीवनावर दीर्घकाळ सकारात्मक परिणाम करतात, किंबहुना योगातील सूक्ष्म व्यायामाची परिणती ही माणसाच्या जीवनाला अधोरेखीत करीत असते, असे प्रतिपादन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे माजी योगाचार्य डॉ सूर्यकांत पाटील यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत एम ए योगशास्त्र, पी जी डिप्लोमा इन योगथेरेपी, पी जी डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अॅन्ड योगिक सायन्स या अभ्यासक्रमांच्या संयुक्त विद्यमाने अतिथी व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील, प्रमुख अतिथी म्हणून प्रादर्शिक कला विभागाचे समन्वयक डॉ भोजराज चौधरी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ श्रीकांत पाटील म्हणाले, योग अभ्यासक्रमाकडे व्यावसायिक दृष्टीने न बघता स्वत: व समाजाचे आरोग्य कसे सुदृढ राहील, याकडे अधिक लक्ष द्यावे.
सूत्रसंचालन प्रा आदित्य पुंड, तर आभार प्रा अश्विनी राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रा राधिका खडगे, प्रा स्वप्निल मोरे, प्रा प्रफुल्ल गंजारे, प्रा अनघा देशमुख, प्रा स्वप्निल ईखार, प्रा स्वाती धनस्कर, प्रा पुजा म्हस्के, प्रा शिल्पा देव्हारे, प्रा राहुल दोडके यांनी अथक परीश्रम घेतले. कार्यक्रमाला विभागातील सर्व अभ्यासक्रमांचे प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थिती होते.