भारती रुग्णालायातील ५७ वर्षीय रुग्णाच्या अवयवदानाने तीन जणांचे प्राण व दोघांना मिळणार दृष्टी

पुणे : एकीकडे देश प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करत असताना, तीन रुग्णांना आरोग्याची स्वसत्ता मिळवून देण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते आणि त्याला यश आले. त्याचे झाले असे, भारती हॉस्पिटल येथे  ५७ वर्षीय रुग्ण मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने ब्रेन डेड अवस्थेत होता. त्याच्या अवयवदानाने अनेकांचे प्राण वाचणार होते हे अतिदक्षता विभागातील डॉक्टरांच्या लक्षात आले आणि चक्रे फिरली. भारती हॉस्पिटल वैद्यकीय सामाजिक विभाग, केरळी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे, आंतरराष्ट्रीय मानवता आयोगाची टीम यांनी नातेवाईकांचे समुपदेशन केले. एम.व्ही. परमेश्वरन व भरत पंजाबी यांनी कुटुंबास मानसिक आधार दिला. नातेवाईकही अवयवदानस तयार झाले. त्यानंतर झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डीनेशन सेंटरच्या आरती गोखले यांना कळवण्यात आले. त्यांनी तत्परतेने ईतर हॉस्पिटल बरोबर समन्वय साधून ऑर्गन अलोकेशनचे काम केले.

Advertisement

The organ donation of patient at Bharti Hospital will save the lives of three people and give sight to two

त्यानुसार एक किडनी भारती हॉस्पिटल येथील रुग्णास  देण्यात आली. दुसरी किडनी अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे देण्यात आली. लिव्हर ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथे देण्यात आले. तर डोळ्यातील कॉर्निया भारती हॉस्पिटल आय बँकेत ठेवण्यात आला आहे. मृत्यूनंतरही अवयवांच्या रूपाने ती व्यक्ती जीवंत राहणार असून यथावकाश कॉर्निया वापरल्यावर त्या डोळ्यातून एखादा अंध जग पाहू शकणार आहे.  

भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले. आरोग्य विज्ञान विभागाच्या संचालिका डॉ. अस्मिता जगताप, मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय ललवाणी, डेप्यू. डायरेक्टर डॉ. जितेंद्र ओसवाल यांचे याकामी मार्गदर्शन मिळाले. भारती हॉस्पिटल अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर, भुलशास्त्र विभाग, युरो सर्जरी, नेफ्रॉलॉजी, न्यूरोलॉजी आणि वैद्यकीय समाजसेवा विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने तीन लोकांना जीवनदान मिळाले तर दोघांना दृष्टी मिळणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page