एमजीएम विद्यापीठात खादी फॅशन शो उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
जिल्हाधिकारी व पोलिस उपयुक्तांनी घेतला सहभाग
छञपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५५ व्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी एमजीएम खादी संशोधन केंद्राकडून रुक्मिणी सभागृहात खादी वसन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या फॅशन शो मध्ये छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व त्यांची मुलगी रूपाली स्वामी, पोलीस उपायुक्त नवनीत कुमार काँवत व त्यांची पत्नी आयआरएस अधिकारी नितीका विलाश यांची विशेष उपस्थिती होती. एमजीएमकडून कुलगुरू डॉ विलास सपकाळ व रचना सपकाळ, डॉ आशिष गाडेकर व डॉ सारिका गाडेकर, रणजीत कक्कड व डॉ अपर्णा कक्कड, डॉ प्रविण सूर्यवंशी व डॉ अस्मिता सूर्यवंशी, डॉ गिरीश गाडेकर व डॉ क्षितिजा गाडेकर, डॉ मीनल जाधव तसेच अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख व इतर संबंधितांनी आपला सहभाग नोंदविला.
एमजीएम संस्थेच्या वतीने दरवर्षी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वदेशी वसन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून एमजीएम खादी केंद्रात बनवलेल्या खादी वस्त्रांचे परिधान करीत सर्व मान्यवर फॅशन शो मध्ये सहभागी होत असतात. हे सर्व परिधान सुसलग्न या कल्पनेतून संचालिका शुभा महाजन यांनी डिझाईन केले होते. एमजीएम खादी केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी यासाठी आपले योगदान दिले. गांधी जयंती निमित्त हे सर्व कपडे २०% सवलतीच्या दरात १५ ऑक्टोबर पर्यंत खादी सेंटर मध्ये विक्री साठी उपलब्ध आहेत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे एमजीएम खादी केंद्राच्या संचालिका शुभा महाजन यांनी यावेळी आवाहन केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ आशा देशपांडे यांनी केले.