डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभिजात माय मराठीचा अभिवंदन सोहळा जल्लोषात
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अक्षरहंडी टाळाने फोडून उदघाटन
विद्यापीठात ‘अभिजात भाषेचा दर्जा’ मिळाल्यानंरचा पहिलाच कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर : माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा शासन आदेश निघाल्यानंतरचा राज्यातील पहिलाच शासकीय कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात थाटात कार्यक्रम थाटात संपन्न झाला. राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अक्षरांची हंडी टाळाने फोडून अनोख्या पध्दतीने हा उदघाटन सोहळा घेण्यात आला. कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा थाटात संपन्न झाला.
केंद्र शासनाने मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. यनिमित्त राज्य शासन व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सायंकाळी विद्यापीठ नाटयगृहात संपन्न झाला. कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली होते. प्र-कुलगुरू डॉ वाल्मिक सरवदे,
कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर मराठी विभागप्रमुख डॉ दासू वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी ’ग्रंथ दिंडी’ने सर्व मान्यवर विद्यापीठ नाटयगृहात आले. पन्नास नामंवत साहित्यिकांची छायाचित्रे व रचनांचे फलक विद्यार्थ्यांच्या हातात घेऊन ही दिंडी नाटयगृहात पोहोचली. दींडीत मंत्री महोदय, मा.कुलगुरु यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, डॉ दासू वैद्य, डॉ मुस्तजीब खान, डॉ प्रवीण वक्ते, डॉ कैलास अंभुरे, डॉ कैलास इंगळे यांच्यासह मान्यवर सहभागी झाले. यानंतर कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी उदय सामंत यांचे स्वागत केले. योगशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यानी ‘अभिजात मराठी’चे अक्षर फलक हाती घेऊन अनोखे सादरीकरण केले.
प्रा पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर डॉ मुस्तजीब खान यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी तसेच संलग्नित महाविद्यालयांच्या मराठी विषयाच्या शिक्षकांची उपस्थिती होती. यावेळी पंडित विश्वनाथ दाशरथे व शाहीर रामानंद उगले हे सांगितीक मानवंदना सादर केली. नांदापूरकर व सुरेश भट्ट यांच्या रचना पंडित दाशरथे यांनी सादर केल्या. तर शाहीर उगले यांनी मराठी भाषेचे गौरवगीत, भवानीचा गोंधळ तसेच गण गौळण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ ही सुरेश भट यांची रचना सादर करून पंडित दाशरथे व सहकारी यांनी सोहळ्याची सांगता केली.
मायमराठीसाठी पाहिजे ते करू – कुलगुरू डॉ विजय फुलारी
मराठवाडा ही संत महंतांची भूमी असून मराठीसाठी खूप काही या भागाने दिले आहे. त्यामुळे माय मराठीसाठी जे जे करणे गरजेचे आहे, तें नक्की करू, असे कुलगुरू डॉ विजय फुलारी अध्यक्षीय समारोपात म्हणाले. 14 ते 28 यादरम्यान अभिजात मराठी भाषा पंधरवाडा विद्यापीठासह चारही जिल्ह्यात महाविद्यालयात प्रभावीपणे राबविण्यात येईल. राज्य शासनानेही आमच्याकडे जरा अधिक निधी आणि लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्यात क्रमांक एकचा निधी देऊ, असे यावेळी मंत्री उदय सामंत यावेळी घोषित केले.
तरच मराठीला चांगले दिवस येतील – सामंत
दोन हजार वर्षांची परंपरा असलेली अभिजात मराठी भाषा ही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. घरात बोलण्यापासून ते प्राथमिक शिक्षणात मराठीला प्राधान्य दिले तरच मराठीला चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन उदय सामंत यांनी केले. १४ ते २८ जोनवारी या दरम्यान मराठी भाषा पंधरवाडा जल्लोषात साजरा करा. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राज्यातील पहिलाच कार्यक्रम घेतल्यामुळे निधीही सर्वाधिक देऊ. कुलगुरु डॉ विजय फुलारी यांचा आदर्श राज्यातील सर्व विद्यापीठ व कुलगुरुंनी घ्यावा, असे आवाहनही मंत्री उदय सामंत यांनी केले.