राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडला. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांची उपस्थिती होती. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे व वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांच्या हस्ते ३० सप्टेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त झालेल्या पुनर्मूल्यांकन विभागातील निम्न श्रेणी लिपिक माया सोमेश्वर गोस्वामी, सामान्य परीक्षा विभागातील चपरासी संजय उत्तमराव घारडे, विद्यापीठ विकास विभागातील चपरासी मोहन दयाराम कार्लेकर तर ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी सेवानिवृत्त झालेले प्र-कुलगुरू कार्यालयातील वरिष्ठ लघुलेखक प्रतिमा दिलीपकुमार पंडा, बॅरि एस के वानखेडे शिक्षण महाविद्यालयातील निवड श्रेणी लिपिक विजय महादेवराव शिरभाते, विद्यापीठ आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा परिचर प्रकाश शंकरराव घोषीकर, शिष्यवृत्ती कक्षातील चपराशी अशोक चंपतराव तिरमारे आणि सेवा संपुष्ट आल्याने अभियांत्रिकी विभागातील एकत्रित वैतनिक नंदलाल संगुलाल डोंगरे, डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील एकत्रित वैतनिक शोभा मधुकर कडू यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय भाषण करताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुढील आयुष्याकरिता तसेच दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन दीपक घोडमारे यांनी केले तर उपस्थित यांचे आभार कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध प्राधिकारणींचे सदस्य, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, विविध शैक्षणिक विभागांचे प्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.