एमजीएम विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाला मिळाले भारत सरकारचे पेटंट

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे डॉ सूर्यकांत सपकाळ व डॉ सुचिता गादेकर यांना ‘इनोव्हेटिव्ह कॅटलिस्ट प्रोसेस फॉर असेमेट्रिक सिंथेसिस ऑफ कैरल कंपाऊंड’ या विषयावरील संशोधनासाठी भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे.

या संशोधनामुळे वेगवेगळ्या बायो ऍक्टिव्ह हेटरो सायकलिक कंपाऊंड तयार करण्यासाठी मदत होऊ शकते तसेच एनान्सिओ सिलेक्टिव्हिटी वाढणे, मोलेक्युलची कार्यक्षमता वाढणे, पर्यावरणीय प्रभाव कमी करणे, प्रॉडक्टची किंमत कमी करणे, स्केलेबिलिटी सुनिश्चित करण्यासाठी तसेच पृथक्करण पद्धती सुधारणा घडवून आणण्यासाठी याचे महत्त्व आहे.

Advertisement

डॉ सूर्यकांत सपकाळ हे एमजीएम विद्यापीठामध्ये विभागप्रमुख व संशोधन मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहेत. हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांचे एडिटरियल बोर्ड मेंबर तसेच मेंबर ऑफ रिव्ह्यूवर् म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अठ्ठेचाळीस शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत.

या यशाबद्दल डॉ सूर्यकांत सपकाळ आणि डॉ सुचिता गादेकर यांचे विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ प्राप्ती देशमुख, संचालक डॉ अण्णासाहेब खेमनर व सर्व संबंधितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page