महाराष्ट्र आरोग्य विज्ञान आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

आरोग्य विद्यापीठाचे ‘चक्र’ सारखे प्रयोगांमुळेच आरोग्य प्रणालीला नवे स्वरुप
मा. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नाशिक : आरोग्य विद्यापीठाचे ‘चक्र’ सारखे प्रयोगांमुळेच आरोग्य प्रणालीला नवे स्वरुप प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन मा. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सेंटर ऑफ एक्सलन्स ‘चक्र’ (Centrefor Health, Applied Knowledge & Research Autonomy)  चे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ मा. मुख्यमंत्री नामदार श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण खात्याचे मा. मंत्री ना. श्री. हसन मुश्रीफ ऑनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर जलसंपदा, कंुभमेळा व आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मा. मंत्री ना. श्री. गिरिष महाजन, शालेय शिक्षण विभागाचे मा. मंत्री     श्री. दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य खात्याचे मा. मंत्री ना. श्री. नरहरी झिरवळ, विद्यापीठात तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे मा. आयुक्त श्री. राजीव निवतकर, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
      याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना मा. मुख्यमंत्री नामदार श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विविध विषयांचे केंद्र म्हणून विद्यापीठानी कार्य करावे. राज्यातील आरोग्य शिक्षण आणि सेवा बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. ’सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या माध्यमातून आरोग्य विद्यापीठ हे ’हब’ स्थापित करण्यात आले आहे तर वैद्यकीय महाविद्यालय ’स्पोक’ म्हणून कार्यरत राहणार आहेत. विद्यापीठांनी अन्य संस्थांना गाईड म्हणून काम करावे इतके आदर्श काम करणे अपेक्षित आहे. विद्यापीठात ’चक्र’ व्दारे जेनेटिक हेल्थ व समाजोपयोगी संशोधनावर अधिक भर द्यावा ज्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना होईल.

         ते पुढे म्हणाले की, मा. पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार ’राष्ट्रीय शिक्षण प्रणालीच्या’ माध्यमातून समाजाला, देशाला उपायोगी रोजगाराभिमुख मॉडेल कार्यान्वीत करावेत. स्टार्टअपला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने शिक्षणसंस्थांनी प्रयत्नशील रहावे. पुढील काही वर्षात ग्रामिण भागातील आरोग्य सेवा ’हब आणि स्पोक’ म्हणून कार्यान्वीत करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नाशिक येथे होणाÚया कुंभमेळयाकरीता डिजिटल कुंभ व आरोग्य कुंभ प्रकल्पाकरीता विद्यापीठाला शासनाकडून योग्य ते सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
           कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, राज्यातील आरोग्य सेवा वृंध्दीगत करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठात सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात आले आहे. आरोग्य विज्ञानाच्या अभ्यासक्रमांची गुणवत्ता उंचावण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना दर्जेदार व किफायतशीर दरात आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी ’चक्र’ कंपनी कार्यान्वीत करण्यात आली आहे.


         त्या पुढे म्हणाल्या की, उत्कृष्टता केंद्रातील संशोधनांचा राज्यातील सर्व सामान्य रुग्णांच्या उपचारात वापर करता येईल. विद्यापीठाने नॅशनल एज्युकेशन पॉलीसीचा अवलंब करुन विविध मॉडेल कार्यान्वीत केले आहेत. स्कुल ऑफ इंटिग्रटेड मेडिसिन, डिजिटल हेल्थच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा उपयोग करुन विविध प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. नाशिक येथे होऊ घातलेल्या आगामी कुंभमेळयाकरीता ’वेलनेस कुंभ’ करीता विद्यापीठ उत्सुक आहे याकरीता शासनाच्या विविध विभागांकडून सहकार्य मिळावे असे त्यांनी सांगितले.
        कार्यक्रमाच्या प्रारंभी मा.नामदार मुख्यमंत्री महोदयांचा विद्यापीठ परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. विद्यापीठ परिसारात उभारण्यात येणाÚया ’चक्र’ जागेची प्रत्यक्ष पहाणी मा. मुख्यमंत्री महोदयांनी केली. यावेळी डिजिटल कळ दाबून मा. मुख्यमंत्र्यांनी ’चक्र’ च्या संकेतस्थळाचा शुभारंभ केला. शासनाने आदेशित केल्यानुसार ’चक्र’ च्या 150 दिवसाचा कृती कार्यक्रम पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शासनातर्फे या उपक्रमासाठी 14.80 कोटी रुपये रकमेचा धनादेश मा. मुख्यमंत्री ना. श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ’चक्र’चे प्रभारी मुख्य अधिकारी ब्रिगे. डॉ. सुबोध मुळगुंद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.


       
        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी आभार मानले.  या कार्यक्रमाकरीता    मा. खासदार डॉ. शोभा बच्छाव, श्री. राहूल ढिकले, मा. आमदार डॉ. राहूल आहेर, मा. आमदार श्रीमती सिमा हिरे, मा. आमदार श्री. दिलीप बोरसे, मा.आ.श्री. दिलीपराव बनकर, मा.आ.श्री. मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, मा. जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा,  महानगर पालिका आयुक्त श्रीमती मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ. श्रीमती अशिमा मित्तल, विशेष पोलीस महानिरिक्षक श्री. दत्ता कराळे, पोलिस आयुक्त श्री. संदीप कर्णीक, आदी मान्यवर लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील व्यक्ती, विद्यापीठाचे प्राधिकरण सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.


‘ चक्र’च्या प्रदर्शनास मा. मुख्यमंत्री यांची भेट
विद्यापीठाच्या ’चक्र’ कंपनी अंतर्गत कार्य करणाÚया फॅकल्टींचे विद्यापीठात मांडण्यात आलेल्या प्रदर्शनाला राज्याचे मा.मुख्यमंत्री नामदार श्री. देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. ’चक्र’ अंतर्गत कार्यान्वीत फॅकल्टी डेव्हलपमेंट अकादमी, सिम्युलेशन लॅब, डिजिटल लर्निंग स्टुडिओ, इन्क्युबेशन सेंटर, डिजिटल हेल्थ सेंटर, क्लिनिकल ट्रायल सेंटर व ’इक्षणा’ म्युझियमचे डिजिटल स्टॉलला भेट देऊन याविषयी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी माहिती दिली. याप्रकारचे ’स्पोक’ निर्माण करुन आरोग्य शिक्षणात व कौशल्य विकासात प्रभावी काम करणे आवश्यक असल्याचे मा. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com