राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘नागपूर फिल्म फेस्टिवल’चा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
नागपूर फिल्म फेस्टिवल ‘माईलस्टोन्स’ ठरेल
व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड यांचे प्रतिपादन
नागपूर : नागपूर फिल्म फेस्टिवल ‘माइलस्टोन’ ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ समय बनसोड यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नागपूर चलचित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १२ जानेवारी दरम्यान आयोजित नागपूर फिल्म फेस्टिवलचा समारोपीय कार्यक्रम रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी पार पडला. यावेळी डॉ बनसोड बोलत होते.डॉ समय बनसोड, नागपूर चलचित्र फाउंडेशन, कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, मनोरंजन,
या कार्यक्रमाला प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ समय बनसोड, अजय राजकारणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नागपूर चलचित्र फाउंडेशन यांच्या दरम्यान नागपूर फिल्म फेस्टिवलबाबत लवकरच समंजस्य करार (एमओयू) केला जाणार आहे. याबाबत विद्यापीठ प्राधिकरण लवकरच धोरणात्मक निर्णय घेईल असे डॉ बनसोड यांनी पुढे बोलताना सांगितले. सहभागी विद्यार्थ्यांना भविष्यात या फेस्टिवलचा मोठा लाभ होणार आहे. लेखक, कलावंत, तंत्रज्ञ होण्यासाठी या फेस्टिवलच्या मास्टरक्लासेमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा भरपूर उपयोग होईल.
या फेस्टिवलला देखील भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. पूर्वी नागपुरात झालेल्या फेस्टिवलमध्ये केवळ पुणे, मुंबई येथून चित्रपट सहभागी व्हायचे. मात्र, या फिल्म फेस्टिवलमध्ये ३५० पेक्षा अधिक चित्रपट सहभागी झाले. त्यातील अर्धे चित्रपट नागपूर परिसरातील असल्याने खऱ्या अर्थाने चित्रपट महोत्सव यशस्वी झाला आहे. येथील विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी असून आगामी काळात चित्रपट महोत्सव अधिक उंचीवर जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे यांनी मार्गदर्शन करताना विद्यापीठाच्या इतिहासात हा सर्वात मोठा फेस्टिवल असल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगळे कलागुण असून आपली कला जोपासण्याकरिता त्यांना या फिल्म फेस्टिवलचा उपयोग होईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देखील विद्यार्थ्यांमध्ये अशाच प्रकारे कौशल्य निर्माण करणावर विशेष भर देण्यात आला आहे. विद्यापीठात देखील या क्षेत्राचे अधिक ज्ञान देणारे अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ समय बनसोड, अजय राजकारणे यांच्या शुभ हस्ते विजेत्या स्पर्धकांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कॅम्पस अ वर्गवारीत उत्कृष्ट एडिटर आणि उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार रिबेल चित्रपटा, उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार विठा चित्रपट, उत्कृष्ट सिनेमेटोग्राफर व उत्कृष्ट संगीत पुरस्कार बरसा चित्रपट, उत्कृष्ट लेखक आणि उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार एक्सेल १०० चित्रपटाने पटकावला. कॅम्पस बी वर्गवारीत उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार असामान्य आई चित्रपट, उत्कृष्ट अभिनेता उत्कृष्ट लेखक व उत्कृष्ट संगीत पुरस्कार गोपाल चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार द डिलिव्हरी, उत्कृष्ट सिनेमेटोग्रफी रोग चित्रपट, उत्कृष्ट एडिटर पुरस्कार कुकून चित्रपटाने पटकावला.
व्यावसायिक लघुपट गटात उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी डोब्या चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार अंबिरकू एन ओंडाराई अझूथावम चित्रपट, उत्कृष्ट लेखक व उत्कृष्ट संगीत पुरस्कार अम्मायू कुडा चित्रपट, उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार माय फादर इज अफ्रेड ऑफ वॉटर चित्रपट, उत्कृष्ट संपादन पुरस्कार त्वमेव सर्वम चित्रपट उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार किचन क्वीन चित्रपटाने पटकावला.
कॅम्पस ए लघुपट वर्गवारीत बरसा चित्रपटाने प्रथम, एक्सएल १०० चित्रपटाने द्वितीय तर रिबेल चित्रपटाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. कॅम्पस ए डॉक्युमेंट्री वर्गवारीत अहिंसा : शेल्टर ऑफ होप चित्रपटाने प्रथम, लढाई छोडब नाही चित्रपटाने द्वितीय तर एनएनटीआर : दि प्राइड ऑफ गोंदिया चित्रपटाने तृतीय क्रमांक पटकावला. कॅम्पस बी लघुपट वर्गवारीत गोपाल चित्रपटाने प्रथम कुकुन चित्रपटाने द्वितीय तर द डिलिव्हरी चित्रपटाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. कॅम्पस बी डॉक्युमेंटरी वर्गवारीत सेवा परमोधर्म चित्रपटाने प्रथम, वादक चित्रपटाने द्वितीय, कागज चित्रपटाने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
बालगट वर्गवारीत कुकली चित्रपटाने प्रथम, बस्ता चित्रपटाने द्वितीय, आम्ही दोघे चित्रपटाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. रिल /वर्टीकल गटात व्हॉट वॉज सी विअरिंग चित्रपटाने प्रथम, टेक टेल्स इन 64 सेकंदने द्वितीय तर सेव एनिमल्स सेव ह्यूमनिटीने तृतीय क्रमांक पटकावला. ॲनिमेशन गटात धर्म रक्षती रक्षता चित्रपटाने प्रथम, अनडिझायर्ड विश चित्रपटाने द्वितीय तर जदैन चित्रपटाने तृतीय क्रमांक पटकावला. व्यावसायिक लघुपट गटात अमेयू कुडा चित्रपटाने प्रथम, किचन क्वीनने द्वितीय तर अंबिरकू एन ओंडाराई अझूथावम चित्रपटाने तृतीय क्रमांक पटकावला. व्यावसायिक डॉक्युमेंट्री वर्गवारीत नवनिर्माण महिला ग्राम संघ एक भरारी चित्रपटाने प्रथम, द लास्ट पॅराडाईज ने द्वितीय तर मशरूम चित्रपटाने तृतीय क्रमांक पटकावला.