डॉ पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात वार्षिक महोत्सव ‘आरोहणम-२०२४’ ची उत्साहात सुरूवात
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथील वसिष्ठ-२०२० बॅचच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे वार्षिक महोत्सव ‘आरोहणम-२०२४’ चे दिनांक ६ ते १० सप्टेंबर दरम्यान आयोजन करून त्यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा तसेच वादविवाद स्पर्धा, फॅशन शो, नाटक, नृत्य स्पर्धा, अवयव प्रदर्शन, बक्षीस वितरण या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
तसेच स्वराज्य-२०२१ बॅचच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे गणेश महोत्सवाचे आयोजन महाविद्यालय परिसरात केलेले आहे. वार्षिक महोत्सव ‘आरोहणम-२०२४’ चा उद्घाटन सोहळा अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख यांचे उपस्थितीत रविवार, दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाला.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ अनिल देशमुख यांनी सांगितले की, वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो. ज्या विद्यार्थ्यांनी क्रीडा व कला प्रकारामध्ये सहभाग दर्शविला त्या सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एसएएमसी प्रतिनीधींनी वार्षिक महोत्सवाचे उत्कृष्ठ आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले. याप्रसंगी शिक्षक प्रतिनीधी डॉ विरेंद्र सावजी व जनरल सेक्रेटरी अजित पाटील यांनी यथोचित मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालय प्रशासनाने केलेले मार्गदर्शन व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाला नॅक कोऑर्डिनेटर डॉ मिलींद जगताप, सांस्कृतिक प्रतिनीधी डॉ मंजुषा देवतळे, क्रीडा प्रतिनीधी संजय वाटाणे, डॉ सविता वावगे, डॉ वर्षा जगताप, वर्ग प्रतिनीधी अभिनव रावणे, वर्तिका तिवारी, शिवम शिंदे, समिक्षा चौधरी, गुंजन गुप्ता, गौरी डहाणे, भुषण साखरे, अमोल मालोदे, क्रिष्णा वर्मा, साक्षी उकरडे, अश्वीण चोखट, चैताली शेंडे, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.