उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचे जल्लोषात समारोप
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रज्ञान प्रशाळेतील वार्षिक सांस्कृतिक महोत्स्व अर्थात २७ व्या ओपन हाऊस या जल्लोषात समारोप झाला. समन्व्यक प्रा. डॉ. जी. ए. उस्मानी आणि संचालक प्रा. डॉ. जे. बी. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव पार पाडला. समारोपावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सुहान्स केमिकल्स जळगाव चे संचालक संदीप काबरा व रोटरी क्ल्ब जळगावचे अध्य्क्ष गनी मेमन यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली.
प्रा. डॉ. जी. ए. उस्मानी यांना प्रशाळेच्या वतीने दिला जाणारा मानाचा लाईफ आईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला. विविध विभागातील विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नृत्य, संगीत, गायन, वादन, समूह नृत्य, पोवाडा, मिमिक्री, यांनी विद्यार्थ्यांमध्ये आनंद द्विगुणित केला, कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांची पावले थिरकली व विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.
प्रा. डॉ. ए. के.गोस्वामी, प्रा. डॉ. आर. पी. गोरे, प्रा. डॉ. आर. एस. सिरसाम, प्रा. डॉ. व्हि.आर. पराते, प्रा. डॉ. यु. डी.पाटील, प्रा. डॉ. जे. एस. नारखेडे, प्रा. डॉ. पी. डी. मेश्राम, प्रा. डॉ. आर. जी. पुरी, प्रा. डॉ. जी. ए. बाठे, प्रा. डॉ. टी. डी. देशपांडे व कार्यशाळा अधिक्षक व्ही. आर. भालेराव यांनी विविध समित्यांच्या माध्यमातून हा सांस्कृतीक महोत्स्व व यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. डॉ. व्ही.आर.पराते यांनी आभार मानले.