भारतीय विद्यार्थी परिषदचे मॉडर्न महाविद्यालयात आंदोलन

मॉडर्न महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांना लेखी मान्यता

पुणे | छत्रपती शिवाजीनगर :

मॉडर्न महाविद्यालय, छत्रपती शिवाजीनगर, पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या Arts, Commerce, Science तसेच BBA विभागातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या गंभीर व मूलभूत समस्यांमुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) तर्फे आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला.

दीर्घ शैक्षणिक परंपरा लाभलेल्या महाविद्यालयात सध्या दिसून येणारी प्रशासकीय उदासीनता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि मानसिक आयुष्यावर थेट परिणाम करत असल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले.

The Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) staged a protest at Modern College in Pune.
The Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) staged a protest at Modern College in Pune.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख समस्या

विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान पुढील गंभीर प्रश्न उपस्थित केले —

  • शिष्यवृत्ती वेळेवर न मिळणे
  • सुरक्षा व्यवस्थेचा पूर्ण अभाव
  • पिण्याच्या पाण्याची अपुरी सुविधा
  • स्वच्छतेकडे दुर्लक्ष
  • संगणक प्रयोगशाळेची दयनीय अवस्था
  • निष्क्रिय प्लेसमेंट सेल
  • प्रशासकीय कामकाजातील हलगर्जीपणा

या समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

महाविद्यालय परिसरात —

  • CCTV कॅमेरे कार्यान्वित नसणे
  • First Aid Kit चा अभाव
  • मुलींच्या स्वच्छतागृहांची खराब अवस्था
  • Sanitary Pad सुविधेचा अभाव

यामुळे विशेषतः विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शिक्षणाच्या ठिकाणीच सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे अभाविपने ठामपणे मांडले.

The Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) staged a protest at Modern College in Pune.

६० दिवसांत सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन

विद्यार्थ्यांनी यापूर्वीही वारंवार निवेदने दिली असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नव्हती. मात्र आजच्या घंटानाद आंदोलनानंतर महाविद्यालय प्रशासनाने सर्व मागण्यांची दखल घेत येत्या ६० दिवसांत विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या व आवश्यक सोयी-सुविधा पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.

या आश्वासनानंतर अभाविपने आंदोलन तात्पुरते स्थगित केले असून, दिलेल्या कालावधीत अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com