संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा चाळिसावा दीक्षांत समारंभ शनिवारी होणार
अमरावती : विद्यापीठाचा चाळिसावा दीक्षांत समारंभ शनिवार, 24 फेब्राुवारी, 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता विद्यापीठ परिसर, अमरावती येथे संपन्न होत आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस भूषवतील. याप्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीचे उपाध्यक्ष प्रा. दीपक कुमार श्रीवास्तव व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते स्वागतपर भाषण व प्रास्तविक करतील. दीक्षांत समारंभाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय या कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सभासद तसेच सर्व विद्याशाखांचे सन्माननीय अधिष्ठाता उपस्थित राहणार आहेत.
परीक्षा/पदवी/पदविकाधारक : विद्यापीठ स्थापनेला 40 वर्ष पूर्ण झाली आहेत. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि पदव्युत्तर शैक्षणिक विभागांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य सातत्याने होत आहे. 423 महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित असून त्यात 05 महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा प्रदान केला आहे. परीक्षा घेण्याचे फार जिकरीचे कार्य विद्यापीठाला करावे लागते, यात सर्वांचा सहभाग महत्वाचा असतो. उन्हाळी 2023 मध्ये 489 परीक्षांचे संचालन करण्यात आले, त्याला 3,38,515 परीक्षार्थी होते. त्यापैकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या 1,75,922 तर माजी विद्यार्थ्यांची संख्या 1,62,593 इतकी होती. हिवाळी 2023 मध्ये 665 परीक्षा घेण्यात आल्यात, त्याला 2,95,387 परीक्षार्थी होते. उन्हाळी 2024 मध्ये 760 परीक्षांचे संचालन करण्यात येणार असून त्याला अंदाजे 3,45,000 परीक्षार्थी राहतील. त्यामध्ये महाविद्यालयीन 1,80,000 तर माजी 1,65,000 परीक्षार्थी राहतील.
या दीक्षांत समारंभामध्ये 41,113 पदवीकांक्षींना व 244 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे.
विद्याशाखानिहाय पदवीकांक्षींची संख्या : मानव विज्ञान विद्याशाखा – 9,591, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा – 8,627, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा – 16,186 आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा – 4,780, या व्यतिरिक्त स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती – 509, स्वायत्त शारीरिक शिक्षण महाविद्यालय (एच.व्ही.पी.एम.), अमरावती – 930 व शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती – 490 अशी आहे.
विद्याशाखानिहाय पदविकाकांक्षींची संख्या : मानव विज्ञान विद्याशाखा – 09, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा – 91, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा – 23 आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा – 121 अशी आहे.
पदके/पारितोषिके : या दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना 118 – सुवर्णपदके, 22 – रौप्यपदके व 24 – रोख पारितोषिके असे एकूण 164 पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभामध्ये देण्यात येणाया पदके/पारितोषिकांसाठी मुले व मुलींमध्ये सर्वाधिक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची वैष्णवी संजय मुळे या विद्यार्थीनीला सुवर्ण – 6 व रोख पारितोषिक – 1, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकोट, जि. अकोला येथील स्नेहल गजानन इंदाणे या विद्यार्थीनीला सुवर्ण – 5, रौप्य – 4 व रोख पारितोषिक – 2, तर डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, अमरावतीची गुंजन अजित गुप्ता या विद्यार्थीनीला सुवर्ण – 5, रौप्य – 2 व रोख पारितोषिक – 1 घोषित झाले आहे. 80 विद्याथ्र्यांना पदके देवून गौरवान्वीत केले जाणार असून यामध्ये मुली – 58 तर मुले – 22 आहेत. यापैकी 4 सुवर्ण व 2 रोख पारितोषिक अशा 6 पदकांसाठी कोणीही पात्र ठरले नाहीत.
आचार्य पदवीधारक : विद्यापीठांतर्गत शिक्षक व संशोधक विद्यार्थी संशोधनाचे कार्य करीत असून आजपर्यंत 5,257 संशोधकांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. या दीक्षांत समारंभात विद्याशाखानिहाय 215 संशोधकांना आचार्य पदवी देवून सन्मानित करण्यात येत आहे. आचार्य पदवी धारकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत एकूण 88 आचार्य पदवीधारक असून त्यामध्ये रसायनशास्त्र विषयात 05, भौतिकशास्त्र 09, संगणक विज्ञान 07, प्राणीशास्त्र 07, गणित 08, परमाणू 01, भूगर्भशास्त्र 01, सांखिकी 02, सूक्ष्मजीवशास्त्र 04, वनस्पतीशास्त्र 05, संगणकशास्त्र व अभियांत्रिकी 12, परमाणू अभियांत्रिकी 07, यांत्रिकी अभियांत्रिकी 06, विद्युत अभियांत्रिकी 03, स्थापत्य अभियांत्रिकी 03, माहिती व तंत्रज्ञान 03, रासायनिक तंत्रज्ञान 01 व भेषजी विज्ञान 04 आदींचा समावेश आहे.
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत एकूण 31 आचार्य पदवीधारक असून त्यामध्ये वाणिज्य विषयात 25, व्यवसाय अर्थशास्त्र 03, व्यवसाय प्रबंधन 02 व लेखा व सांख्यिकी 01 आदींचा समावेश आहे.
मानव विज्ञान विद्याशाखेत एकूण 64 आचार्य पदवीधारक असून त्यामध्ये इंग्रजी विषयात 17, मराठी 06, संगित 03, संस्कृत 01, मानसशास्त्र 03, अर्थशास्त्र 05, समाजशास्त्र 04, भूगोल 04, इतिहास 04, तत्वज्ञान 01 व विधी 16 आदींचा समावेश आहे.
आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा एकूण 32 आचार्य पदवीधारक असून त्यामध्ये शिक्षण विषयात 10, शारीरिक शिक्षण 11, ग्रंथालय व माहितीशास्त्र 09, समाजकार्य 01 व वस्त्र व प्रावरण 01 आदींचा समावेश आहे.
पदके, पारितोषिके प्राप्त विद्यार्थ्यांना सूचना : विद्यापीठाच्या चाळिसाव्या दीक्षांत समारंभामध्ये पदके व पारितोषिके प्राप्त करणाया विद्याथ्र्यांना सकाळी 8 वाजेपर्यंत दीक्षांत समारंभास्थळी उपस्थित रहावयाचे आहे. त्यांनी उपस्थित झाल्यानंतर सभामंडपातील वित्त विभाग व परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेशी संपर्क साधावयाचा आहे.
दीक्षांत समारंभाचे वेबसाईटवर लाईव्ह प्रक्षेपण : चाळिसाव्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमाचे विद्यापीठ युट¬ुब चॅनलवरुन सकाळी 10.00 ते कार्यक्रम संपेपर्यंत थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ लाईव्ह बघण्याची सुविधा जगभरातील सर्व संबंधित विद्यार्थ्यांना व पालकांना उपलब्ध होणार आहे.