संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा चाळिसावा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

शिक्षण व आरोग्य क्षेत्रात आर्टीफिशियल इंटेलिजन्सव्दारे व्यापक परिवर्तन – कुलपती

अमरावती : शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात आर्टीफिशियल इंटेलिजन्सव्दारे व्यापक परिवर्तन येणार असून विद्यार्थ्यांनी त्याचे फायदे व भविष्यात होणारे नुकसान लक्षात घेऊन आपली ज्ञानाची कक्षा रुंद करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू होत असून जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर भारत विश्वातील महाशक्ती बनेल, त्यात विद्यापीठांची महत्वपूर्ण भूमिका निश्चितच राहणार आहे.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीचे उपाध्यक्ष प्रा. दिपक कुमार श्रीवास्तव, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.आर.एम. कडू, डॉ.आर.डी. सिकची, डॉ.व्ही.एच. नागरे, डॉ.एच.एम. धुर्वे, डॉ. मोना चिमोटे, डॉ.यु.बी. काकडे, सौ. मोनाली तोटे पाटील, डॉ. नितीन कोळी, डॉ.व्ही.एम. मेटकर, श्री.ए.एम. बोर्डेे, प्रो. अनुपमा कुमार, डॉ. वैशाली गुडधे, डॉ.डी.डब्ल्यु. निचित, डॉ. तनुजा राऊत, डॉ.व्ही.आर. मानकर आदी उपस्थित होते. विद्यापीठांना आवाहन करतांना ते पुढे म्हणाले, विद्यापीठांनी आपला शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांमधील उद्योजकता आणि नवकल्पनांना वाव द्यावा. प्रशासनात आमुलाग्र सुधारणा करुन विद्याथ्र्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. दत्तक ग्राम, सामाजिक उपक्रमांमध्ये तसेच विद्यापीठाच्या विकास व विस्तारामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा असे सांगून त्यांना पदके व पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आणि आचार्य पदवीधारकांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

विद्यापीठ स्थापनेला चाळीस वर्षे पूर्ण झाली असून शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी कौतुक केले. माता अंबादेवी, संत गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, गुलाबराव महाराज, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पदस्पर्शाने व कर्माने ही भूमि पावन झाली आहे. संत गाडगे बाबांनी आपल्या आयुष्यात शिक्षण व स्वच्छतेला महत्व दिले. त्यांची दशसूत्री सर्वांसाठी दिशादर्शक आहे. ज्ञान ही समजुतदारपणा आणि प्रगतीची किल्ली आहे आणि याच पायावर सभ्यता निर्माण होते. चिकित्सक बुध्दी ही स्वस्थ व संपन्न समाजाचा पाया आहे. त्यामुळे शिक्षण निरंतर सुरु ठेवावे. आपला देश जगातील सर्वात मोठा युवा देश म्हणून आज पुढे येत आहे. देशामध्ये जगाला जनशक्ती पुरवण्याची क्षमता आहे. पंतप्रधानांनी तरुणांमधील क्षमता ओळखून व्हॉइस ऑफ युथ 2047 कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सन 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी आगामी 24 वर्षात प्रत्येक क्षणाचा आपण उपयोग करावा, असे आवाहन करुन येणा-या शैक्षणिक सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. अमरावती शहराची वेगळी ओळख महाराष्ट्रात आहे. विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार मिळेल व त्यांचे कौशल्य वाढेल या दृष्टीने विद्यापीठाने अभ्यासक्रम तयार करावेत. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासोबत कार्य करुन विद्यार्थ्यांना स्किल्स प्रदान करणारे अभ्यासक्रम सुरु करावेत, असे सांगून राज्यपालांनी सर्व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शुभकामना दिल्यात.

मुख अतिथी प्रो. दिपक कुमार श्रीवास्तव म्हणाले, आज सन्मानाची आणि बहुमानाची गोष्ट म्हणजे आमच्या उज्ज्वल व आ·ाासक पदवीधारकांच्या यशाचा उत्सव आपण साजरा करीत आहोत. संत गाडगे बाबांनी अंधश्रध्दा व व्यसन समाजातून दूर व्हावे, यासह शिक्षण आणि — वर भर देऊन लोकांना प्रेरीत केले. विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांची विचार व कार्य सर्वांपर्यंत पोहचविल्या जात आहे. अध्ययनाच्या नवकल्पना वर्गखोल्यांच्या चार भिंतीपलिकडे गेल्या आहेत. अध्ययनासोबतच इंटर्नशिप, कम्युनिटी कनेक्शन, डिजिटल तंत्रज्ञान, वास्तविक जगातील समस्यांशी जोडणारे प्रोजेक्ट आधारित शिक्षण यासारखे नवीन उपक्रम भारतात राबविले जात आहे. आमचा विद्यार्थी ज्ञान आत्मसात करण्यास आणि समाजात योगदान देण्यास तयार आहे. स्मार्टफोनने तो सुसज्ज असून नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्यास तो तयार आहे.

ग्लोबल स्टार्टअप इको सिस्टिम इंडेक्समध्ये भारत तिस-या क्रमांकावर आहे. स्टार्टअपचा मागोवा घेऊन आलेल्या अपयशातून शिकणे महत्वाचे असून विद्याथ्र्यांच्या नाविण्यपूर्ण कल्पनांना पुढे नेणे आवश्यक आहे. महात्मा गांधी म्हणाले होते, तुम्ही आज काय करता, यावर भविष्य अवलंबून आहे. विकसित भारत, आझादी का अमृत महोत्सव यासारख्या उपक्रमांतर्गत मांडलेल्या थीम्स उज्ज्वल आणि सर्वसमावेशक भविष्यासाठी महत्वाच्या आहेत.

सर्वात तरुण नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसा फझाई हिने एकमूल, एक शिक्षक, एक पुस्तक, एक पेन जग बदलू शकते. प्रतिकुल परिस्थितीत मलालाचे धैर्य व लवचिकता आपल्याला जगण्यासाठी प्रेरित करतात. स्मार्ट तंत्रज्ञानाचे वाढलेले वास्तव, इंटरनेट, कृत्रिम बुध्दीमत्ता या उत्पादकता वाढीसाठी आणि उज्ज्वल जीवनासाठी महत्वाच्या आहेत. न्यूरॉलिंगच्या मेंदुच्या चीपचे यशस्वी रोपण करुन न्यूरल तंत्रज्ञानातील अलिकडची प्रगती, आरोग्य सेवा व मानवी क्षमतेच्या शक्यतांचे एक नवीन युग सुरू करते. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये केलेल्या प्रगतीचा आनंद साजरा करीत असतांना त्याच्या नैतिक आणि सामाजिक परिणामांबद्दल समाजाने जागृत राहिले पाहिजे. शिक्षण हे ज्ञान प्राप्त करणे, मूल्ये रुजविणे, शहाणपण वाढविणे एवढेच नसून जीवनात अमूलाग्र परिवर्तन सुध्दा घडवून आणत आहे. जागतिक समस्यांवर चर्चा करुन आणि सांस्कृतिक समज विद्याथ्र्यांमध्ये वाढविणे, तसेच शा·ात भविष्य निर्माण करण्यासाठी वचनबध्द व नैतिकतेची समाजाप्रती जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. या समारंभात दोनशेहून अधिक आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. सामाजिक समस्यांवर आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या माध्यमातून कार्य होईल असा मला वि·ाास आहे. विद्यार्थ्यांनो, विविध आदरमूल्यांचा स्वीकार करा, त्यातून तुमचे जीवन समृध्द होईल. तुम्ही ज्ञानाचे दुत आणि बदलाचे एजंट म्हणून जगात पाऊल टाका. स्वप्नांची पू्र्तता करा असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्यात.

Advertisement

कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते

कुलपती व अतिथींचा परिचय करुन दिल्यानंतर कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, विद्यापीठ स्थापनेला चाळीस वर्षे झाली आहेत. चाळिसाव्या दीक्षांत समारंभामध्ये विद्यापीठातर्फे 215 संशोधकांना आचार्य पदवी व गुणवत्ता यादीत स्थान पटकाविणा­या विद्यार्थ्यांना 118 सुवर्णपदके, 22 रौप्यपदके व 24 रोख पारितोषिके तसेच संलग्नित महाविद्यालयांतील 39,184 विद्याथ्र्यांना, तर स्वायत्त महाविद्यालयांतील 1929 विद्यार्थ्यांना पदवी याशिवाय संलग्नित महाविद्यालयांतील 244 विद्याथ्र्यांना पदविका प्रदान करण्यात आल्यात.विद्यापीठात विविध शैक्षणिक व भौतिक विकासाची कामे सातत्याने सुरु असून भौतिक सुविधांमध्ये नित्य भर पडत आहे. रुसा अंतर्गत 8.65 कोटी रुपयांची बांधकामे पूर्ण झाली आहेत, तर 10.46 कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. ्विद्यापीठाला प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियानांतर्गत (पी.एम.उषा) 20 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. विद्यापीठातील पायाभूत सुविधांसह वैज्ञानिक उपकरणांवर हे अनुदान खर्च केले जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचा विद्यापीठाने स्वीकार केला असून शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये त्याची अंमलबजावणी केली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून पदवी पातळीवर देखील नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असून त्यासाठी हे विद्यापीठ सज्ज झाले आहे. सर्व विद्याशाखांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमांची पुनर्रचना सुरू आहे.

भारताच्या आर्थिक विकासाचा फायदा तरुण पिढीला घ्यायचा असेल, तर उद्योजकता, नवकल्पना, संशोधन व कौशल्य विकास यावर आपल्याला भर द्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने आपले अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असेल. संशोधन आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी विद्यापीठाने विविध स्टार्टअप कार्यक्रमांचे आयोजन केले. शैक्षणिक विभागातील शिक्षकांचे 12 पेटंट यावर्षी मंजूर झाले आहे. डॉ. अनिता पाटील यांच्या किडनी स्टोन विषयाक पेटंटचे व्यवसायिकरण झाले, त्याव्दारे क्रश कॅप्सूलचे उत्पादन सुरु झाले आहे. आविष्कार स्पर्धेत विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. क्रीडा क्षेत्रात खेळाडूंंनी नेत्रदीपक कामगिरी करुन विद्यापीठाचा नावलौकीक जागतिक स्तरावर पोहचविला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत.

कोरोना काळात विद्यापीठाने स्थापन केलेल्या कोविड प्रयोगशाळेला यावर्षी चार वर्ष पूर्ण होत असून या बदलत्या जीवनाची अनेक आव्हाने उभी असून येणारा भविष्यकाळ विज्ञान, तंत्रज्ञान व उद्योग यांचा राहणार आहे. प्रयोगशाळेव्दारे आतापर्यंत 5 लाख रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांसमोर विद्याथ्र्यांना मार्केट इकॉनॉमीची दखल घ्यावी लागणार असून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी स्वत:ला सक्षम केल्यास उद्याचा भविष्यकाळ त्यांना आपलासा करता येईल. बाजारपेठी अर्थव्यवस्थेला लागणारी कौशल्ये व ज्ञान संपादन केल्यास आपला विद्यार्थी मागे राहणार नाही, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुलपती महोदयांचा व प्रमुख अतिथींचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन विद्यापीठाच्यावतीने सत्कार करण्यात आला. अधिष्ठाता यांनी पदके, पारितोषिके प्राप्त विद्यार्थी व आचार्य पदवीधारकांना प्रदान करुन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते व प्रमुख अतिथी डॉ. दिपक कुमार श्रीवास्तव यांनी सन्मानित केले. उद्घोषण डॉ. प्रणव कोलते व डॉ. सुलभा पाटील यांनी केले. कु. स्वरश्री केतकर हिने गायिलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, प्राधिकारिणी सदस्य, विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वाधिक पदके व पारितोषिके

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची वैष्णवी संजय मुळे या विद्यार्थीनीला सर्वाधिक सुवर्ण – 6 व रोख पारितोषिक – 1, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकोट, जि. अकोला येथील स्नेहल गजानन इंदाणे या विद्यार्थीनीला सुवर्ण – 5, रौप्य – 4 व रोख पारितोषिक – 2, तर डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, अमरावतीची गुंजन अजित गुप्ता या विद्यार्थीनीला सुवर्ण – 5, रौप्य – 2 व रोख पारितोषिक – 1 यांना सर्वाधिक पदके व पारितोषिकाने कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सन्मानित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page