एमजीएममध्ये `टेक्सटाईल आर्टवर्क`, अव्हंत गार्द एक्स्ट्राव्हॅगंझा, पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन
दिनांक २० फेब्रुवारीला होणार स्पर्धा; आकर्षक पारितोषिकांसह सर्व सहभागींना मिळणार प्रमाणपत्र
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील लिओनार्दो द विंची स्कूल ऑफ डिझाईनतर्फे (एलएसओडी) `टेक्सटाईल आर्टवर्क` स्पर्धा घेण्यात येणार असून `फ्रॉम स्क्रॅप टू स्प्लेंडर` हा याचा विषय आहे. अव्हंत गार्द एक्स्ट्राव्हॅगंझा अंतर्गत स्पर्धेसाठी शाश्वत फॅशन हा विषय निश्चित करण्यात आला आहे. पोस्टर मेकिंग, ग्राफिक डिझाईन, प्रिंट मेकिंग स्पर्धा घेण्यात येत आहे. विद्यापीठातील `एलएसओडी` येथे दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी ही स्पर्धा होणार आहे. `टेक्सटाईल आर्टवर्क`, अवंत गार्द एक्स्ट्राव्हॅगंझा स्पर्धेसाठी सकाळी अकरा ते दुपारी एक अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
स्पर्धेवेळी नोंदणी करण्याची संधीही उपलब्ध आहे. स्पर्धेचा निकाल दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. निवड कलाकृतींना प्रदर्शन संस्थेमध्ये मांडण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व सहभागींनी प्रशस्तीपत्र वितरित करण्यात येणार आहेत.
स्पर्धेच्या माहिती व नोंदणीसाठी संपर्क :
`टेक्सटाईल आर्टवर्क`साठी मोबाईल क्रमांक ८१८००३५८७२ आणि नोंदणीसाठी लिंक…
https://forms.gle/5K8vSrCk9JziCRHt7
अव्हंत गार्द एक्स्ट्राव्हॅगंझासाठी मोबाईल क्रमांक ९८६०२४४७६५ आणि नोंदणीसाठी लिंक…
https://forms.gle/DUtA9pEkB9fU2zt56
पोस्टर मेकिंग, ग्राफिक डिझाईन, प्रिंट मेकिंगसाठी मोबाईल क्रमांक ८६००६०७७०६ आणि नोंदणीसाठी लिंक…
https://forms.gle/T4Nv94H9UvnaMcuc8