‘इंद्रधनुष्य’ महोत्सवासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा संघ रवाना
प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांनी दाखविली हिरवी झेंडी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची चमू इंद्रधनुष्य महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ सांस्कृतिक महोत्सवासाठी रवाना झाली आहे. अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात इंद्रधनुष्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ सांस्कृतिक चमूला प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांनी हिरवी झेंडी दाखवित बुधवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी रवाना केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सोपानदेव पिसे व विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ यांची उपस्थिती होती.
विद्यापीठाच्या चमूमध्ये शास्त्रीय एकल गायनामध्ये राधा ठेंगडी, उपशास्त्रीय संगीताकरिता तेजस्विनी खोडतकर, शास्त्रीय वादन चमूत सुयोग देवलकर आणि निधी भालेराव, सुगम संगीताच्या चमूत आयुषी देशमुख, राधा ठेंगडी, तेजस्विनी खोडतकर, आयुषी देशमुख आणि इंद्रायणी इंदूरकर; समूहगीतात निधी रानडे, निधी इंगळे, सुयोग देवलकर आणि निधी भालेराव यांचा समावेश आहे.
पाश्चिमात्य एकल गायनात क्षितीज मेश्राम, पाश्चिमात्य एकल वादनात जोश लाल, लोकगीत गायनात सुयोग देवलकर, निधी भालेराव, याद्विक बंगाले, मधुर बक्षी, समीक्षा परचाके यांचा, तर पाश्चिमात्य समूह गायनात क्षितीज मेश्राम, आदी रिंगे, अनुज गुप्ता, अमनाडा सायमन्स, अक्स बेंजामिन, धनश्री आणि जोश लाल यांचा समावेश आहे. शास्त्रीय नृत्यात कल्याणी चिकुलवार, तर नाट्य चमूत शशांक रहांगडाले, मोहित सरकार, युगलहंस मरकम, चिराग शुक्ला, शिफा अन्सारी, नंदिनी नहाते आणि तानिया पंडित विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.
नकला प्रकारात ब्रायन डोंगरदिवे, वादविवादात मेहंदी शेख आणि विशाल खर्चवाल, तर प्रश्नमंजुषेत प्रथमेश लांजेवार, अनुष्का नाग आणि निर्मित लंगडे यांचा समावेश आहे. चित्रकला गटात रणजीत वानखडे, मृणाली कांबळे, हर्षल लिखार आणि अपूर्वा ताकसांडे यांच्या सह अन्य कलावंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
इंद्रधनुष्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यापीठाच्या चमूला प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ विजय खंडाळ यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.