शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात “शिक्षका दिन व माजी विद्यार्थीं स्नेह मेळावा” संपन्न
विद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे – डॉ वर्षा मैंदरगी
कोल्हापूर : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या प्रसाराच्या काळामध्ये शिक्षकांची जबाबदारी वाढलेली असून विद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ वर्षा मैंदरगी यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागामार्फत डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ”शिक्षका दिन व माजी विद्यार्थीं स्नेह मेळावा” आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ मैंदरगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ सरिता ठकार उपस्थित होत्या.
माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तथा विभागातील विद्यार्थ्यांचा विविध व्यवसायिक पात्रतेसाठी आवश्यक असलेल्या सेट, नेट, सिटेट, पीएचडी परीक्षांमधील यशाबद्द्ल मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी अधिष्ठाता डॉ सरिता ठकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पल्लवी कांबळे, ऐश्वर्या मुरुथवर व नेहा लाटे यांनी केले.
कार्यक्रमामध्ये शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ चेतना सोनकांबळे, डॉ रुपाली संकपाळ, डॉ विद्यानंद खंडागळे, डॉ सुप्रिया पाटील, सरस्वती कांबळे, सारिका पाटील, संगिता चंदनवाले यांचेसह विभागातील बी एड – एम एड व एम एड अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
—–