विवेकानंद महाविद्यालयात शिक्षक दिन ‘स्वयंशासन दिन’ म्हणून उत्साहात साजरा
छत्रपती संभाजीनगर : शहरातील विवेकानंद कला सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिक्षक दिन 2024-25 च्या निमित्ताने स्वयंशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने एक दिवसासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी शिपाई-विषयशिक्षक-पर्यवेक्षक, उपप्राचार्य अशा अनेक भूमिकेतून आपली चुणूक दाखवून दिली. इयत्ता ११ वी व १२ वीच्या वर्गावर अध्ययन अध्यापनाचे कार्य करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये शिक्षक दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य प्रो डॉ डी आर शेंगुळे, प्रमुख उपस्थिती मध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा प्रदीप पाटील तसेच कला व वाणिज्य विभागाचे पर्यवेक्षक प्रा गणेश दळे उपस्थित होते. तसेच आजच्या शिक्षक दिनानिमित्त आयोजित स्वयंशासन दिनाचे उपप्राचार्य म्हणून सौरभ गायकवाड तर पर्यवेक्षक म्हणून साक्षी सौदे यांनी भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला व वाणिज्य शाखेचे पर्यवेक्षक गणेश दळे सर यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त आयोजित स्वयंशासन दिनाचे शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात स्वप्निल मगरे, सलवा नाझ, संचिता शिरसाठ, प्रगती जाधव, प्रीती भालेराव व सौरभ गायकवाड यांनी केले.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा प्रदिप पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर ज्यांनी आज शिक्षक म्हणून आपले भूमिका बजावली अशा खालील उत्कृष्ट शिक्षकांचा क्रमांक काढून त्यांचे बक्षीस वितरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी आर शेंगुळे यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता ११ वी वर्गातून प्रथम – दवणे साक्षी पिराजी (कला), व्दितीय – परिपेली श्रेयस (वाणिज्य), तृतीय – भिंगारे यश (वाणिज्य) व 12 वी वर्गातून प्रथम – प्रजापती देवकीनंदन (वाणिज्य), व्दितीय – मगर समीक्षा (कला), तृतीय-सवणे ज्ञानेश्वर (कला) आदी.
विद्यार्थ्यांच्या मनोगत व्यक्त झाल्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत प्राचार्य प्रो डॉ डी आर शेंगुळे यांनी केले. त्यात त्यांनी स्वयंशासन दिनाचे मनभरून कौतुक केले. असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत जावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साक्षी सौदे हिने केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे समीक्षा मगर व दीपिका साबळे यांनी केले. कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.