तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कर्नाटकात शैक्षणिक सहल
सहलीसह घेतली मायक्रो लॅब्स लिमिटेड बंगलोर, बॉटनिकल गार्डन म्हैसूर, आयुर्वेदिक फार्मसी म्हैसूरला भेट
उमरगा : भारत शिक्षण संस्था संचालित तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घेतली कर्नाटक राज्यातील बेंगलोर तसेच म्हैसूर शहरातील विवीध फार्मास्युटिकल. कंपन्या तसेच शैक्षणिक स्थळांना भेटी दील्या यावेळी मायक्रो लॅब्स लिमिटेड बंगलोर, बॉटनिकल गार्डन म्हैसूर, आयुर्वेदिक फार्मसी म्हैसूर येथे भेट दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कवलजीत बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी विद्यार्थ्यांनचे हित व सर्वांगीण विकासासाठी व उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांच्या ज्ञाना मध्ये भर पडली पाहिजे तसेच शिक्षण पुर्ण झाल्यानंतर विद्यार्थांना या विषयी माहिती असली पाहिजे या धोरणाने महाविद्यालयातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना फार्मा इंडस्ट्रीचे कामकाज कसे चालते याबद्दत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. फार्मा इंडस्ट्री मधे वापरण्यात येणाऱ्या सर्व इन्स्ट्रुमेंट दाखवण्यात आले. कंपनी मध्ये औषध कश्या प्रकारे तयार होत काय कच्चा माल लागत असतो या विषयी विद्यार्थांना माहिती देण्यात आली, फ्लो ऑफ मनुफॅक्चरिंग प्रोसेस यामधे डिस्पेन्सिंग, ग्रानुलेशन, कॉम्प्रेशन, कोटिंग, फायनल पॅकेजिंग, प्रॉडक्ट डिस्पॅच याबद्दल पूर्ण माहिती देण्यात आली व कंपनीचा सर्व परिसर विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.
बॉटनिकल गार्डन म्हैसूर येथे विविध औषधी वनस्पती दाखवण्यात आल्या. विविध रोगांवर कोणत्या वनस्पतीची औषधी म्हणून वापरण्यात येतात तसेच औषधी वनस्पती वापर करण्याची काळाची गरज याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच आयुर्वेदिक फार्मसी येथे विविध आजारांवर वापरण्यात येणारे वनस्पती पासून तयार केलेल्या औषधाबद्दल माहिती दिली. सदर सहल सलग आठवडा भराची होती, 74 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी प्रा तरमुडे अंकुश, प्रा सूरज भगत, प्रा लक्ष्मण निंबले, प्राध्यापिका भगत दिपाली, किशोर गायकवाड उपस्थित होते.