एमजीएम विद्यापीठात आयईईई’च्या ‘कोड ए थॉन’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संघ प्रथम छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठ युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आयईईई’च्या स्टूडेंट ब्रँचच्या वतीने आयोजित ‘कोड ए थॉन’ या जिल्हास्तरीय स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज विद्यापीठाच्या आर्यभट सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी, अधिष्ठाता डॉ एच एच शिंदे, विभागप्रमुख डॉ शर्वरी तामणे, प्रा विजया अहिरे, स्टुडंट ब्रँचचे प्रसाद वखरे, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते. ‘कोड ए थॉन’ या स्पर्धेत एकूण ४८० विद्यार्थ्यांच्या २४० संघांनी आपला सहभाग नोंदविला. अॅ्प्टिट्यूड टेस्ट, एमसीक्यू टेक्निकल क्वशन्स आणि प्रोग्रमिंग काँटेस्ट या तीन स्पर्धांमधून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन संघांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या संघांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ रुपयांची रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ‘कोड ए थॉन‘ स्पर्धेतील विजेत्या संघांची नावे : प्रथम क्रमांक : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (सहभागी स्पर्धक : पंकज नवले, गिरीराज पारिक) द्वितीय क्रमांक : एमजीएम युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, छत्रपती संभाजीनगर (नरेंद्र जाधव, प्रियेश सहिजवाणी) तृतीय क्रमांक : देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (अथर्व वंधारे, सागर वाघमारे) कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर अधिष्ठाता डॉ एच एच शिंदे, विभागप्रमुख डॉ शर्वरी तामणे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विजया अहिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा वीर,

Read more

एमजीएम विद्यापीठात आयईईई’ च्या वूमन इन इंजिनियरिंग स्टूडेंट ब्रँचचे उद्घाटन संपन्न

‘एम्पॉवर्ड सिटीझन, वूमन लेड डेव्हपमेंट अंडर विकसित भारत @ २०४७ व्हिजन‘ कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न छत्रपती संभाजीनगर :  महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मार्फत आयईईई’च्या वूमन इन इंजिनियरिंग स्टूडेंट ब्रँचचा उद्घाटन सोहळा आज विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. हा सोहळा संपन्न झाल्यानंतर ‘एम्पॉवर्ड सिटीझन, वूमन लेड डेव्हपमेंट अंडर विकसित भारत @ २०४७ व्हिजन’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या उद्घाटन सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून ग्राइंड मास्टर मशिनच्या व्यवस्थापकीय संचालक मोहिनी केळकर, सोशल मीडिया इन्फ्लुंसर शांभवी गुप्ता तर विद्यापीठाच्या वतीने कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरु डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर,  विभागप्रमुख डॉ.शर्वरी तामणे, प्रा. विजया अहिरे,  बी स्टुडंट ब्रँचचे प्रसाद वखरे,  आदित्य बक्षी, वैष्णवी चौधरी,  प्रेरणा वीर  व सर्व  संबंधित  उपस्थित होते. आयईईई’च्या वूमन  इन इंजिनियरिंग ब्रँचचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाल्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुंसर शांभवी गुप्ता यांनी ‘डेटा सायन्स डेमीस्टीफाईड’ तर ग्राइंड मास्टर मशिनच्या व्यवस्थापकीय संचालक मोहिनी केळकर यांनी ‘वूमन लीडरशिप इन इंडस्ट्री विकसित भारत @२०४७’  या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्राइंड मास्टर मशिनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती मोहिनी केळकर यावेळी बोलताना म्हणाल्या, आपल्या स्वत: च्या आतला आवाज ओळखून आपल्या करिअरचा निर्णय घेतला पाहिजे. कोणत्याही शाखेतआपण शिकत असू मात्र, मूलभूत गोष्टींचे ज्ञान आपल्याला असणे अत्यंत आवश्यक आहे. एकमेकांशी सहाय्यक आणि समूहाने एकत्रित काम करण्याचा दृष्टिकोण सर्वांनी बाळगत कार्यरत असणे आवश्यक आहे.आजच्या काळामध्ये काम करीत असताना कंटेंट महत्वपूर्ण घटक आहे. समाजमाध्यमांचा वापर करीत असताना तो विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. विशेषत: लिंक्डईन हे तुमचे परिचयपत्र आहे. या माध्यमातून जगासमोर आपण आपली ओळख निर्माण करीत असतो. समकालीन काळामध्ये नोकरीच्या शोधत असताना ‘फ्री लांसिंग’ हा एक करियरचा महत्वपूर्ण पर्याय आपल्यासमोर खुला असून या क्षेत्रात नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. आपण आपली आवड जोपासत करियरची निवड करणे गरजेचे असून या प्रक्रियेतून जात असताना समाजाच्या बोलण्याचा विचार करण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन सोशल मीडिया इन्फ्लुंसर शांभवी गुप्ता यांनी केले. आजच्या कार्यक्रमात कुलगुरु डॉ विलास सपकाळ आणि कुलसचिव डॉ आशिष गाडेकर यांनीही यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक प्रा. विजया अहिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

Read more

एमजीएम विद्यापीठातील टेक्सटाईल आर्टवर्क स्पर्धेत श्रेया आणि स्वाती प्रथम पारितोषिक विजेत्या

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाईनतर्फे (एलएसओडी) घेण्यात आलेल्या टेक्सटाईल आर्टवर्क स्पर्धेमध्ये श्रेया घोंगडेने प्रथम क्रमांक मिळविला असून प्रियांका गवळे द्वितीय पुरस्कार विजेती ठरली आहे. प्रमोदिनी चक हिची उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या ‘अव्हंत गार्द एक्स्ट्राव्हॅगंझा’ अंतर्गत स्पर्धेसाठी ‘शाश्वत फॅशन’ हा विषय निश्चित करण्यात आला होता. यामध्ये स्वाती मगरने प्रथम क्रमांक पटकवला असून आकाश बडोले द्वितीय पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत सानिया शेखला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर व अधिष्ठाता डॉ. मोनिका अग्रवाल यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Read more

You cannot copy content of this page