भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा २५ वा पदवी प्रदान समारंभ संपन्न
युवकांनी आता देशासाठी संपत्तीचे निर्माते बनावे – राज्यपाल रमेश बैस पुणे : आज भारताकडे असणारी युवाशक्ती हे देशाचे सर्वांत मोठे बलस्थान आहे. त्यामुळेच अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागलेले आहे. आपण सारे काही करू शकतो या भूमिकेतून आपल्या तरुणांनी आता संपत्तीचे निर्माते बनण्याची गरज आहे. असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २५ व्या पदवी प्रदान समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करतानाते बोलत होते. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा डॉ शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास कुलगुरू डॉ विवेक सावजी, प्र-कुलगुरू डॉ विश्वजीत कदम, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ अँथनी रोज, कुलसचिव जी जयकुमार, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या पदवी प्रदान समारंभात ५८५८ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. ५६ विद्यार्थ्यांना पीएच डी ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रत्येक विद्याशाखांमध्ये
Read more