एमजीएम विद्यापीठात ‘स्वरवंदना’ विशेष कार्यक्रम संपन्न
छत्रपती संभाजीनगर : गुरुपौर्णिमेनिमित्त एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘स्वरवंदना’ या विशेष कार्यक्रमाची प्रस्तुती केली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अपूर्वा जाधव, श्रावस्ती जेवरीकर, तुषार अंभोरे, विनोद पवार, ओम केकान, दिशा पटेल, आनंद राजहंस यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
स्वरवंदना कार्यक्रमास यमन रागाने प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर अपूर्वा जाधव आणि वेदिका घन यांनी ‘गुरु एक जगी त्राता’, ज्ञानेश्वरी विधाटे व स्वाती सुलताने यांनी ‘गुरु तोचि देव’, पूजा सावळे व श्रावस्ती जेवरीकर यांनी ‘गुरुविना नाही दुजा आधार’, तुषार अंभोरे व तनिष्क गोसावी यांनी ‘खेळ मांडला’, संस्कृती स्वामी यांनी ‘विष्णुमय जग’ इत्यादी बहारदार गीतांच्या सादरीकरणातून गुरूंना वंदन करीत त्यांच्याप्रति असलेली आपली कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना ओम केकान, श्रेयस कुलकर्णी, रितेश सोनवणे यांनी साथसंगत केली. याप्रसंगी पवन दशरथ व मुस्कान शेख यांनीही एकपात्री स्वगते सादर केली.
कार्यक्रमास आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, विभागप्रमुख प्रा डॉ राजू सोनवणे, प्रा राहुल खरे, प्रा सतीश जोगदंड, डॉ मंजुश्री लांडगे, डॉ अनिता फुलवाडे, दिपाली चौंडीये, सरला मणियार आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी गायलेल्या भैरवीने स्वरवंदने’ची सांगता झाली.