स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्ताने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन उत्सहात साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र-संचालक डॉ डी एम खंदारे, विशेष कार्यासन अधिकारी डॉ दिगंबर नेटके, वित्त व लेखाधिकारी मोहम्मद शकील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ सिंकू कुमार सिंह, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ चंद्रकांत बाविसकर, मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ पराग खडके, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ शैलेश वाढेर, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ विनायक जाधव, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ भास्कर माने, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी उपस्थितांना भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ राजेंद्र गोणारकर यांनी केले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या विद्यार्थ्यांनी गायले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page