डॉ डी वाय पाटील रुग्णालय व नॅशनल बर्न्स सेंटरच्या सहकार्याने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

पुणे : डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे यांच्यावतीने तसेच  नॅशनल बर्न्स सेंटरच्या सहकार्याने आगीच्या घटनांमध्ये भाजलेल्या रुग्णांच्या जखमांवर उपचार तसेच  मोफत सुधारात्मक शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दि.  30 आणि 31 मार्च २०२४ रोजी नॅशनल बर्न सेंटर, ऐरोली, नवी मुंबई येथे करण्यात येत आहे.  या दोन दिवसीय मोफत उपचार शिबीरात आगीच्या घटनांमध्ये जळालेल्या रुग्णांवर आवश्यक त्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

मोफत तपासणी व शस्त्रक्रियेसंदर्भातील पूर्वतपासणी तसेच नाव नोंदणी (पेशंट प्री-स्क्रीनिंग) सोमवार ते शनिवारदुपारी 2 ते 4 वा तसेच मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे मुख्य आयोजन दि  30 आणि 31 मार्च 2024 रोजी नॅशनल बर्न सेंटरऐरोलीनवी मुंबई येथे संपन्न होईल.

Advertisement

डॉ. डी. वाय. पाटील  रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथील तज्ज्ञ प्लॅस्टिक सर्जन या शिबिरात आपले योगदान देत आहेत. याबाबत अधिक माहिती देताना, प्लॅस्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. गुरुस्वामी विश्वनाथ म्हणाले,  “आगीच्या भीषण अपघातांमधून वाचलेल्यांना त्यांचे जीवन परत मिळवून देण्यात मदत करण्याचा प्रवास प्रेरणादायी आहे. सामूहिक प्रयत्न आणि पाठिंब्याद्वारे या शिबिराचे आयोजन होत आहे  याद्वारे शिबिरार्थींना नक्कीच फायदा मिळेल व  त्यांना सक्षम करण्याचे आमचे ध्येय या माध्यमातून पूर्ण होईल. लोकांना बरे करून नवे आयुष्य देण्यासाठी आम्ही  वचनबद्ध आहोत आणि या पुढे ही आम्ही प्रत्येक व्यक्तीला जगण्याची आशा देण्याचा प्रयत्न करत राहू”.

आगीच्या अपघातांमधील रुग्णांना मदत करणे हा प्रमुख  उद्देश हा या उपक्रमाचा आहे. नॅशनल बर्न्स सेंटर द्वारे आगीच्या घटनांमधील पीडीतांच्या आरोग्य दृष्टीने सुधारात्मक उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना, पुनर्वसन, प्रशिक्षण,  संशोधन अशा सर्वांगीण दृष्टीने कार्यरत असणारे हे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. 

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ आणि देवनार यांनी आयोजित केलेले हे शिबिर जन आरोग्यहित साद्य करीत आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा आणि पूर्व तपासणीसाठी यावे असे आवाहन डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय रुग्णालय व नॅशनल बर्न्स सेंटर, आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.

शिबिराचा तपशील:

पूर्वतपासणी तसेच नाव नोंदणी (पेशंट प्री-स्क्रीनिंग): सोमवार ते शनिवारदुपारी 2 ते 4 वा

शस्त्रक्रिया शिबीर30 आणि 31 मार्च 2024

स्थळ: नॅशनल बर्न्स सेंटरऐरोलीनवी मुंबई

फोन: 022-27796660 – 63.  रोटरी देवनार – 9892649582

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page