एमजीएम विद्यापीठाच्या सुनीता ओव्हळकर यांना साहित्यसेवा कार्यगौरव पुरस्कार प्रदान
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील भारतीय तसेच विदेशी भाषा संस्थेतील एमए मराठी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी तथा नामवंत कवयित्री सुनीता ओव्हळकर यांना ‘साहित्यसेवा कार्यगौरव पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले.
ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने टाकळी भान येथे आयोजित तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत, संदीप पटारे, सागर पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

सुनीता ओव्हळकर यांना ‘साहित्यसेवा कार्यगौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, संचालक डॉ के पी सिंग, प्रा डॉ राम गायकवाड, प्रा डॉ मारुती गायकवाड आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.