सुनील थोरात यांनी वाढदिवसानिमित्त सोलापूर विद्यापीठास ५१ आंब्याचे रोपे देत केले वृक्षारोपण

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यापीठास केशर आंब्याचे 51 रोपे देत वृक्षारोपण केले.

Sunil Thorat planted 51 mango saplings to Solapur University on the occasion of his birthday
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करताना कुलगुरू प्रा प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे व अन्य.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांनी थोरात यांच्या या कार्याचे कौतुक केले. यावेळी विद्यापीठ कॅम्पसमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने कुलगुरू प्रा महानवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे, सिनेट सदस्य डॉ वीरभद्र दंडे, उपकुलसचिव डॉ उमराव मेटकरी, सहायक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे, संघटनेचे माजी अध्यक्ष गजानन काशीद यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने यंदा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध समाजसेवा संस्थांनी देखील विद्यापीठास रोपे भेट देत आहेत. याची प्रेरणा घेऊन आपण आपल्या वाढदिनी विद्यापीठात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला, असे थोरात यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page