शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या दोन्ही रग्बी संघांने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये केली सुवर्ण व रजत पदकांची कमाई
कोल्हापूर : शनिवार दि. २० जानेवारी ते दि. २४ जानेवारी दरम्यान चंदिगढ विद्यापीठ, मोहाली (पंजाब) येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रग्बी स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या दोन्ही रग्बी संघाने 7’S SIDE क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक तर 15’s SIDE क्रीडा प्रकारामध्ये रजत पदक पटकावत अखिल भारतीय अंतर विद्यापीठ रग्बी स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे नाव उंचावले. तसेच 7SIDE प्रकारामधील मुलींच्या संघाची निवड २१ ते २३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान गुवाहाटी (आसाम) या ठिकाणी होणाऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ राष्ट्रीय रग्बी स्पर्धेसाठी झाली आहे.
सदर संघाचे प्रशिक्षक म्हणून दीपक पाटील व प्रा. राहुल लहाने तर संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. संग्रामसिंह मोरे व प्रा. अर्जुन पिटुक आहेत. शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के, प्र कुलगुरू डॉ पी एस पाटील, कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे तसेच संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण डॉ शरद बनसोडे यांनी खेळाडूना शुभेच्या दिल्या.