शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्सच्या विद्यार्थिनींना शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती जाहिर
नॅनोसायन्स अॅन्ड बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनींची विविध शिष्यवृत्तींसाठी अभिनंदनीय निवड
कोल्हापूर : स्कूल ऑफ नॅनो सायन्स अॅण्ड बायोटेक्नॉलॉजी या अधिविभागातील संशोधक विद्यार्थिनी कस्तुरी अशोक रोकडे, यांची दक्षिण कोरीया येथील इंन्चॉन नॅशनल विद्यापीठ येथे INU SURE लॅब व्हिजिटिंग स्टुडंट प्रोग्रॉम अंतर्गत निवड झाली असुन यासाठी त्यांना 2 लाख रूपये इतकी शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांनी स्कूल ऑफ नॅनो सायन्स अॅन्ड बायोटेक्नॉलॉजी येथून बी. एस्सी. एम. एस्सी (एकात्मिक) नॅनोसायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीची पदवी घेतली असुन त्या सध्या याच विभागात डॉ. टि. डि. डोंगळे यांच्या मार्गदर्शना खाली पीएच. डी. करत आहेत.
तसेच याच विभागातील एम. एस्सी भाग 1 या वर्गात शिकणा-या विद्यार्थिनी संध्या अनिल घाटगेरा, सातारा यांना सितारा मजिंदाल फाऊंडेशनतर्फे पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहिर करण्यात आली. शैक्षणिक खर्च व हॉस्टेल खर्चयासाठी 33,000/- प्रतिवर्ष असे त्याचे स्वरूप असुन ती दोन वर्षासाठी आहे. याच प्रमाणे बी. एस्सी. -एम. एस्सी (एकात्मिक) भाग 1 मध्ये शिकणा-या माऊली सुभाष पाटील. रा. येळवडे ता. राधानगरी यांना इंडिया बुल्स फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती जाहीर झाली असून 75% शैक्षणिक फी म्हणजे 20,000/- प्रतिवर्ष असे एकुण पाच वर्षासाठी ही शिष्यवृत्ती त्यांना मिळणार आहे.
शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डि. टि. शिर्के, प्र. कुलगुरू, प्रा. डॉ. पी. एस. पाटील. कुलसचिव व्ही. एन. शिंदे, अधिविभागाचे संचालक प्रा. डॉ. के. के. शर्मा तसेच सर्व शिक्षक यांनी विद्यार्थिनिंचे अभिनंदन केले.