एमजीएम विद्यापीठात ‘स्कूल कनेक्ट’ उपक्रमाचे यशस्वीपणे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्यावतीने महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णय क्रमांक : संकिर्ण – २०२४/प्र. क्र.०१/विशि – ३ या दिनांक ५ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० च्या अंमलबजावणीमुळे होणाऱ्या विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक बदलांबाबत विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट) हे संपर्क अभियान मराठवाड्यात यशस्वीपणे राबविले आहे. एमजीएम विद्यापीठ हे नवीन शैक्षणिक धोरणाची पूर्णपणे अंमलबजावणी करणारे मराठवाड्यातील पहिले विद्यापीठ आहे. शासनाच्या निर्देशानुसार एमजीएम विद्यापीठाकडून मराठवाड्यातील जिल्हे, तालुक्यांसह गावपातळीवरील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये भेटी देऊन कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. स्कूल कनेक्ट अभियानाच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी शनिवार, दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बोर्ड रूम, दूसरा मजला, प्रशासकीय इमारत येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कुलगुरूनी शासनाच्या निर्देशानुसार समन्वय समितीची स्थापना करण्याच्या सूचना कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांना देण्यात आल्या.

समकालीन तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नागरिकांना ‘ग्लोबल सिटीझन’ बनविण्याच्या उद्देशाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे भारतीय शिक्षण क्षेत्रामध्ये आवश्यक असे आमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी हे धोरण आपण स्वीकारलेले आहे. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाने या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी अत्यंत चांगल्याप्रकारे केली असून ही इतर संस्थांसाठी आदर्शवत अशीच आहे. आज राज्यातील अनेक विद्यापीठे आणि संस्था एमजीएम विद्यापीठाच्या एनईपीच्या यशस्वी प्रयोगाचे कौतूक करीत ते आदर्शवत मॉडेल स्वीकारत असताना दिसत आहेत.

Advertisement

एमजीएम विद्यापीठ स्तरावर स्कूल कनेक्ट अभियान राबविण्यासाठी कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठित करण्यात आली. या समन्वय समितीमध्ये कुलसचिव, सर्व अधिष्ठाता, गुणवत्ता हमी कक्षाचे सदस्य, संलग्नित महत्वाच्या वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, जनसंपर्क अधिकारी, शाळांशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला. त्याप्रमाणे या उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबाजावणी होण्याकरिता विद्यापीठाच्या गुणवत्ता हमी कक्षाच्या (IQAC) प्रमुख डॉ.परमिंदर कौर धिंग्रा यांना जबाबदारी देण्यात आली.

दिनांक १५ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान या अभियानाच्या माध्यमातून १०० पेक्षा अधिक शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन सुमारे ७००० विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात सविस्तरपणे माहिती देण्यात आली. या संपर्क अभियानाची अंमलबाजवणी करण्याकरिता संवादक म्हणून संवाद कुशल वक्तृत्वगुण असलेल्या विद्यापीठातील आणि संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांमधून साधन व्यक्तींची विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विभागवार निवड करण्यात आली होती.

कोट : एमजीएम विद्यापीठामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची यशस्वीपणे अंमलबजावणी सुरू असून विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेता आणि त्यांना इतर विद्याशाखांचा अभ्यास करीत असताना आपल्या मूळ विद्याशाखेचा अभ्यास सुरू ठेवता यावा यास्तव विद्यापीठ स्तरावर एकच वेळापत्रक तयार करण्यात आले. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मेजर मँडेटरी, मेजर इलेक्टिव्ह, मायनर, ओपन इलेक्टिव्ह, व्होकेशनल स्किल कोर्स, स्किल इनहान्समेंट कोर्स, ऍबिलिटी इनहान्समेंट कोर्स, इंडियन नॉलेज सिस्टीम, व्हॅल्यू एजुकेशन कोर्स, ऑन जॉब ट्रेनिंग/इंटर्नशिप, फिल्ड प्रोजेक्ट, कॉम्युनिटी एंगेजमेंट अँड सर्व्हिस, को – करिक्युलम कोर्स, रिसर्च मेथोडॉलॉजी, रिसर्च प्रोजेक्ट आदिची विद्यापीठाने पूर्णतः तयारी केली असून याची योग्यप्रकारे अंमलबजावणी होत आहे. उद्याच्या उज्ज्वल भारताचे भविष्य असणारे विद्यार्थी आम्ही घडवित आहोत. विद्यार्थ्यांना उच्च दर्जा, कौशल्याधारित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page