‘स्वारातीम’ विद्यापीठातील यशस्वी विद्यार्थ्यांचा कुलगुरूंच्या हस्ते होणार सत्कार
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संकुलामधून ‘नेट’, ‘सेट’, ‘गेट’, जि-पॅट’ आणि ‘यूपीएससी’ व ‘एमपीएससी’ मधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते दि १४ ऑगस्ट रोजी स ११:०० वा विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहामध्ये होणार आहे.
विद्यापीठ परिसरातील संकुलामधून जवळपास १२५ विद्यार्थी यावर्षी ‘नेट’, ‘सेट’, ‘गेट’, जि-पॅट’ आणि ‘यूपीएससी’ व ‘एमपीएससी’ सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळविले आहे. यानिमित्त यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे आणि त्यामधून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी. या उद्देशाने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पालकासह विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात निमंत्रित केले आहे आणि त्यांचा सन्मानही पालकासह होणार आहे. असे समितीचे प्रमुख तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील यांनी कळविले आहे.