शिवाजी विद्यापीठातील नॅनो सायन्सच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेत आणि संशोधनात यश

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स अॅण्ड बायोटेक्नॉलॉजी या अधिविभागमधील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपले यश सिध्द केले आहे. अमेय सबनीस आणि निकिता पाटील यांनी पुन्हा एकदा नॅनोसायन्स अधिविभागाचे नाव लौकीक वाढवला आहे. अमेय माधव सबनीस (रा गडहिंग्लज) याची निवड भारत सरकारच्या गृह खात्यात अधिकारी म्हणून झाली आहे. अमेय, नॅनोसायन्सच्या २०२० च्या बॉचचा गुणवान विद्यार्थी आहे. विशेष म्हणजे अमेयचा बी एस सी – एम एससी नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी हा ५ वर्षाचा इंटीग्रेटेड कोर्स कोरोना काळात पूर्ण झाली आहे.

Advertisement

कोरोना काळात ध्येयासक्ती आणि अभ्यासावरील निष्ठा कायम ठेऊन त्याने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करुन  गृह खात्यात नोकरी निवडली. निकिता जगन्नाथ पाटील (रा सांगली) हिने सुद्धा बी एस सी – एम एससी नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी हा  कोर्स, पहिल्या क्रमांकाने कोरोना काळात पूर्ण केली आहे. त्यानंतर तिने भारतातील नामवंत कंपनी फ्लोरोसेंस परफ्युममध्ये रीसर्च आणि डेव्हलोपमेंटमध्ये अनेक नॅनोप्रॉडक्ट बनवली आहेत. निकिता, सध्या अमृता युनिव्हर्सिटी, कोईम्बतूर येथे बायो सेन्सर या विषयात पी एच डी पूर्ण करत आहे. विद्यार्थ्यांच्या मते, ५ वर्षाचा नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी हा इंटीग्रेटेड कोर्स शिकत असताना बहुविद्याशाखीय (Multidisciplinary) अभ्यासक्रमाचा फायदा स्पर्धा परीक्षा व संशोधन करताना झाला.

नॅनोसायन्समधील विद्यार्थ्यांची अशी विविध क्षेत्रातील उपलब्धी पाहून कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिव यांचा आनंद द्विगुणित झाला. तसेच नॅनोसायन्समधील विद्यार्थ्यांनी भविष्यात अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. नॅनोसायन्स अधिविभागाचे संचालक प्रा डॉ के के शर्मा तसेच सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page