महिला नाट्य स्पर्धेत एमजीएम विद्यापीठाच्या विद्यार्थिनींचे यश
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला नाट्य स्पर्धेत एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्य विभागाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‘जाईच्या कळ्या’ या महिला नाट्यास सांघिक तृतीय पारितोषिक मिळाले आहे. दिग्दर्शनाचे तृतीय पारितोषिक प्रांजल साळवे हिला तर अभिनयाचे तृतीय पारितोषिक केतकी जडी हिला प्राप्त झाले.
सदर नाट्यात रोशनी वाघमारे, भक्ती जाधव, नेहा इंगोले, केतकी जडी व प्रांजल साळवे यांनी भूमिका केल्या होत्या. तर दीपक राखे, आर्या ईघारे, यश ससाणे, रितेश पेंढारकर यांनी तांत्रिक बाजू सांभाळली होती.
या यशाबद्दल कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, अधिष्ठाता डॉ जॉन चेलादुराई, विभागप्रमुख डॉ राजू सोनवणे, प्रा राहुल खरे, सतीश जोगदंड यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.