देवगिरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे इपिटोम प्रोजेक्ट कॉम्पिटीशनमध्ये यश
छत्रपती संभाजीनगर : टेक इलेक्ट्रा अंतर्गत इपिटोम प्रोजेक्ट कॉम्पिटीशनमध्ये देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्षांचे विद्यार्थी गौरी कानझोडे, राम किरगे व आकांक्षा पुंड यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल त्यांचे व महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
दि 26 व 27 मार्च 2024 रोजी छत्रपती संभाजीनगरातील टेक-इनेक्ट्रा अंतर्गत इपिहोम नावाची प्रोजेक्ट कॉम्पीटीशन आयोजित केली होती ज्यामध्ये अतिशय नाविण्यपुर्ण संकल्पना असणारे प्रोजेक्टस विद्यार्थ्यांनी सादर केले होते. या स्पर्धेतच मरावाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सलाईन मॉनिटरींग सिस्टीम हा अतिशय महत्वपुर्ण तथा नाविण्य असलेला प्रोजेक्ट सादर केला होता. यामध्ये सलाईन लावल्यानंतर ती संपत आल्यावर मेसेज व कॉलव्दारे संबंधित नर्सला सुचित केले जाते.
या प्रोजेक्टसाठी प्रा अमितपालसिंग पुणेवाले व प्रा कृष्णा दाचावार यांचे मार्गदर्शन लाभले.
विदयार्थ्यांच्या या उत्कृष्ठ अशा कामगीरीसाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशदादा सोळुंके, सचिव सतीश चव्हाण, उपाध्यक्षबी शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्षबी किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य विश्वास येळीकर, प्रदीप चव्हाण, महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ एस व्ही लहाने, विभागप्रमुख डॉ सत्यवान धोंडगे, डॉ राजेश औटी, डॉ गजेंद्र गंधे, प्रा संजय कल्याणकर, डॉ सचिन बोरसे, डॉ शोएब शेख, डॉ रुपेश रेब्बा, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.