डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘राज्यशास्त्र’च्या ९ विद्यार्थ्यांचे ‘सेट’ मध्ये यश

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील नऊ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षेत यश मिळवले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ७ एप्रिल रोजी घेतलेल्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या विभागाची परंपरा या विद्यार्थ्यानी कायम राखली आहे.

Dr Babasaheb Ambedkar Marathwada University BAMU

विभागप्रमुख प्रा डॉ शुजा शाकीर व कुलसचिव प्रा डॉ प्रशांत अमृतकर यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सविता नागे, जालिंदर गवळी, शुभम सदावर्ते, योगेश सुरवडे, गौतम बर्फे, सुबोध अंभोरे, कुणाल इंगळे, ज्ञानेश्वर टापरे हे उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे विभागात नेट, सेट क्लास नियमित घेतले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com