अमरावती विद्यापीठातील निसर्गेापचार-योगथेरपी विद्यार्थ्यांच्या बंगलोर येथे अभ्यास दौ-याचे आयोजन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत येणा-या पदव्युत्तर पदविका निसर्गेापचार व योगशास्त्र, पदव्युत्तर पदविका योगथेरपी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना योगथेरपी, निसर्गेापचार, योगशास्त्रचिकीत्सा प्रणाली व प्रात्याक्षिकाचे सखोल ज्ञान मिळावे आणि आधुनिक उपकरणांची माहिती व्हावी, भविष्यातील संधी मिळाव्यात, या हेतूने बैंगलोर येथे अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर अभ्यास दौयादरम्यान बंगलोर येथील स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था, आर्ट ऑफ लिÏव्हग इंटरनॅशनल सेंटर व आर्ट ऑफ लिÏव्हग म्हैसूर आश्रम बंगलोर येथे भेट देऊन तेथील अद्ययावत माहितीचा अभ्यास करतील. विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात अभ्यासक्रमाच्या समन्वयक डॉ. अश्विनी राऊत, पदव्युत्तर पदविका योगथेरपीचे समन्वयक प्रा. आदित्य पुंड यांच्या नेतृत्वात प्रा. रणजीत बसवनाथे, प्रा. राधिका खडके, प्रा. राहुल दोडके, प्रा. स्वातीधनस्कर प्रा. वृषाली जवंजाळ यांच्यासहे विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी होणार असल्याची माहिती विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी दिली.