नुतन फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा सीमा बायोटेक व रामकृष्णा ऍग्रोटेकला अभ्यास दौरा
सांगली : राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्था संचलित नुतन कॉलेज ऑफ फार्मसीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहरातील सीमा बायोटेक व रामकृष्णा ऍग्रोटेक कंपनींना शैक्षणिक भेट देऊन माहिती घेतली.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांचे हित, सर्वांगीण विकासासाठी व शिक्षण पुर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कंपनीविषयी माहिती असावी यासाठी महाविद्यालयातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.
फार्मसी व्यतिरिक्त नवीन स्टार्टअप आयडिया पहायला मिळाव्यात व स्वतःचा उद्योग कमीत कमी भांडवलामध्ये कसा चालू करता येईल हा उद्देश ठेवून या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्राचार्य डॉ राजेश जगताप यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांना सीमा बायोटेक मध्ये क्लचर मीडियाचे कामकाज व प्रक्रिया दाखवण्यात आली. कंपनीमध्ये अगार मीडिया वापरून कशा प्रकारे वनस्पती तयार होतात, त्यांची टेस्टिंग, सिलेक्शन, ग्रोथ तसेच इंपोर्ट या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
रामकृष्णा ऍग्रोटेक मध्ये वनस्पती व फळभाज्या वापरून बिट सरबत, बिट कॅंडी, बिट रूट जाम, बिट सॉस, पपई सॉस गाजर कॅंडी असे बरेच उत्पादक पहायला मिळाले त्याच बरोबर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस यामधे कच्चा माल निवडणे, कॉलीटी कन्ट्रोल, कॉलीटी अशुरन्स, कोटिंग, फायनल पॅकेजिंग याबद्दल माहिती देण्यात आली. विविध रोगांवर कोणत्या वनस्पती औषधी म्हणून वापरण्यात येतात याचे मार्गदर्शन मिळाले. या सर्व भेटीचे कामकाज प्रा मनोहर केंगार यांनी पहिले.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ नुतन माळी व सचिव डॉ रामलिंग माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.