हैदराबाद मुक्त विद्यापीठातील अधिकाऱ्यांचा मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे अभ्यास दौरा

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, हैदराबाद येथील अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव आणि इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या अभ्यासदौऱ्यात त्यांनी मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांविषयी, तसेच विद्यापीठातील इतर विभागांच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ यशस्वीपणे वाटचाल करत आहे, याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले.

याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव एव्ही राम एन रेड्डी, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक लेबकू विजया कृष्णा रेडी, जनसंपर्क अधिकारी डॉ पी वेणू गोपाल रेड्डी, आणि माजी परीक्षा नियंत्रक पी व्ही रमाना त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड, डॉ प्रकाश देशमुख, संचालक, विद्यार्थी सेवा विभाग, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, नियोजन अधिकारी डॉ राम ठाकर, उपकुलसचिव चंद्रकांत पवार, सुनिल विभांडिक व प्रदीपकुमार पवार, संगणक कक्ष (परीक्षा) तसेच मॅग्नेटिकचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com