महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात अजिंठा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अभ्‍यास दौरा


वर्धा : अजिंठा विद्यालय, वर्धा येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाचा अभ्‍यास दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पराडकर मीडिया लॅब, गांधी हिल्स, संग्रहालय, प्रशासकीय भवन इत्यादींना भेट दिली आणि विविध शैक्षणिक अभ्‍यासक्रमांची व उपक्रमांची माहिती घेतली.

यावेळी विद्यार्थ्यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत सादर केले.

Advertisement

या दौऱ्यात अजिंठा शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप पाटील, शिक्षक नीलकंठ गुल्हाणे, विपिन ढोले, विजया बोकाडे, पंकजा गादेवार यांच्यासह ४२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विश्‍वविद्यालयाच्‍या जनसंचार विभागातील सहायक प्रोफेसर रेणू सिंह, जनसंपर्क अधिकारी बी एस मिरगे, जनसंचार विभागाचे हेमंत दुबे, मिथिलेश राय यांनी त्यांना विविध उपक्रमांची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *