उद्योग व्यावसायाला विद्यार्थ्यांनी प्राधान्या द्यावे – शिवाजीराव पवार
सोलापूर : शासकीय सेवेत नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणाला शासकीय नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. कुटुंबाचा आणि आपला आर्थिक विकास साध्य करावयाचा असेल तर तरुणांनी नोकरी पेक्षा उद्योग व्यवसायाला प्राधान्या देणे आवश्यकच आहे. असे प्रतिपादन यशदाचे प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि 17 ते 21 मार्च 2025 या कालावधीत विद्यापीठामध्ये आयोजित प्रेरणा राज्यस्तरीय युवा नेतृत्व शिबिराच्या दुसर्या दिवशीच्या व्याख्यानात पवार बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा डॉ विकास पाटील उपस्थित होते होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी शिवाजीराव पवार म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रात छोटा उद्योग सुरु केला पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला वेगवेळे प्रश्न भेडसावत असतात. त्यामुळे आजच्या तरुण पिढिसमोर अनेक प्रश्न आहेत. तसा नोकरीचा देखिल प्रश्न आहे. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता वेळेचे भान लक्षात घेवून आणि वास्तवाची जाणीन ठेवून उद्योग व्यावसाय सुरु करणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुणोनी सेवा क्षेत्र, उत्पादन क्षेत्र आणि प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य द्यावे असेही शिवाजीराव पवार यांनी स्पष्ट केले.
दुसर्या दिवशीच्या पहिल्या सत्रात युवकांचे नेतृत्व आणि पर्यावरण विकास या विषयावर राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वय डॉ विरभद्र दंडे यांनी मांडणी केली. यावेळी अध्यक्षस्थानी मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठात डॉ वसंत कोरे उपस्थित होते. तिसर्या सत्रात उमाकांत चनसेट्टी यांनी युवक कार्याच्या संकल्पना या विषयावर मांडणी केली. कौशल्य विकास आणि रोजगार या विषयावर कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ प्रभाकर कोळेकर यांनी मांडणी केली.
यावेळी डॉ कोळेकर म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे कौशल्य विकशीत करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे कौशल्य आहे असेच विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कौशल्य विकशित करावी. असे डॉ कोळेकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा विठ्ठल एडके यांनी केले तर आभार महादेव व्हनकळस यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस विभागाच्या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.