स्कूल ऑफ अलाइड सायन्सेसच्या “टेक्नोव्हेंट” महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंगीच्या स्कूल ऑफ अलाईड सायन्सेसचे आयोजन
वर्धा : दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित स्कूल ऑफ अलाइड सायन्सेसच्या शालेय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे दोन दिवसीय टेक्नोव्हेंट महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवात आयोजित ब्रेनस्टॉर्म क्विझ, कोडक्लॅश, कोड अनराव्हल, वेबविझार्ड्स, हॅकव्हर्स, ईस्पोर्ट एरिना, टेकव्हिजन आणि रॉक अँड रील अशा वैविध्यपूर्ण स्पर्धांमध्ये विविध महाविद्यालयातील दोनशे पन्नासहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.



टेक्नोव्हेंट महोत्सवाचे उद्घाटन अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाॅ गौरव मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, रवी नायर भौतिकोपचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ इर्शाद कुरेशी, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ केटीव्ही रेड्डी, दत्ता मेघे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पेठे, सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशनचे संचालक डॉ छितिज राज, वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ पंकजकुमार अनावडे, कार्यक्रम संयोजक सुप्रिया नरड, सहसंयोजक प्रांजली उल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञान कौशल्यांना विकसित करण्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देणारा हा महोत्सव आहे, असे मनोगत यावेळी डाॅ गौरव मिश्रा यांनी व्यक्त केले.
महोत्सवात आयोजित तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धांचे संयोजन सुधीर आगरमोरे, रीना सातपुते, तृप्ती कापसे, डॉ शैलेश गहाणे, प्रांजली उल्हे, अतुल ठवरे यांनी केले. टेक्नोव्हेंट महोत्सवातील ब्रेनस्टॉर्म क्विझमध्ये प्रथम एडीडिओंग अक्पाबिओ व प्रतीक वाडेकर तर द्वितीय प्रियांशू शिंदे व श्रेयश देवघरे यांना पुरस्कार प्राप्त झाला.
कोडक्लॅश स्पर्धेत प्रथम शादाब शेख व फरहान पठाण तर द्वितीय प्रज्वल ढोके व हर्षल देशमुख, कोड अनराव्हल स्पर्धेत प्रथम प्रियांशू शिंदे, द्वितीय राहेल सोमबारे, वेबविझार्ड स्पर्धेत प्रथम पवन झिलपे, द्वितीय भूषण काळे, हॅकव्हर्स स्पर्धेत विजेते फरहान पठाण, अथर्व कोळपकर, आर्यन चौधरी व गौरव फुलझेले तर उपविजेते ईशांक ऋषभ, वैभव जोशी व अभिजीत मोघे ही चमू, टेकव्हिजन स्पर्धेत प्रथम ईशांक ऋषभ, वैभव जोशी व अभिजीत मोघे तर द्वितीय साक्षी इझणकर आणि रॉक अँड रील स्पर्धेत प्रथम अथर्व सालवटकर तर द्वितीय मयूर कुचेवार हे विद्यार्थी पुरस्काराचे मानकरी ठरले. ई स्पोर्ट एरिना स्पर्धेचे विजेतेपद दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसीच्या चमूने पटकावले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीसह मोना देखाटे, प्रशासकीय अधिकारी शैला चौधरी, विद्यार्थी संयोजक ऋषभ तिवारी, फरहान पठाण तसेच समन्वयकांनी अथक परिश्रम घेतले.