सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या “व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि कबड्डी” संघामध्ये निवड
नागपूर : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या, सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालय येथील विद्यार्थिनींची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक च्या “व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि कबड्डी” संघामध्ये निवड सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालय नागपूर, येथील बेसिक बीएससी नर्सिंगच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी प्राजक्ता ढोले ह्या विद्याथीनीची व्हॉलीबॉल संघामध्ये, लिखिता लाकडे ह्या विद्यार्थींनीची बास्केटबॉल तसेच बीएससी नर्सिंगच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी सलोनी जांभुळकर ह्या विद्यार्थिनींची कबड्डी संघामध्ये २६ व्या महाराष्ट्र आंतरविद्यापीठ “क्रीडा मोहत्सव २०२४” स्पर्धेसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या मुलीचा संघामध्ये निवड झाली आहे.

हि स्पर्धा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे दिनांक १८ ते २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था मधील व्यवस्थापन सदस्य तसेच महाविद्यालयाचा प्राचार्या डॉ रुपा वर्मा आणि महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षक भारती पेंदाम व क्रीडा शिक्षक समन्वयक नॅन्सी डोमिन्गो यांनी विद्यार्थिनींच्या यशाबद्दल अभिनंदन केले.