NPTEL जर्मन कोर्स परीक्षेत देविगरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या विद्यार्थ्यांनी NPTEL (National Programme on Technology Enhanced Learning) जर्मन कोर्स परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कोर्समध्ये जर्मन भाषेच्या व्याकरण, शब्दसंग्रह, उच्चार आणि संवाद कौशल्यांचा सामवेश आहे, तसेच विद्यार्थ्यांना जर्मन संस्कृती आणि इतिहासाबद्दल माहिती दिली जाते.
कोर्सच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना व्हिडिओ लेक्चर्स, असाइनमेंटस आणि व्किझ यांच्या साहाय्याने ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळते. कोर्स पुर्ण केल्यानंतर दिल्या जाणाऱ्या परिक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान केले जाते. यावर्षी महाविद्यालयाच्या 59 विद्यार्थ्यांनी या कोर्सची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे, या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ. आरती वाढेकर, प्रा. एस. के. कापडे व प्रा. जी.एस. लिपाने यांनी मार्गदर्शन केले.
सहभागी विद्यार्थ्यांचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशदादा सोळुंके, सचिव सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य विश्वास येळीकर, श्री. प्रदीप चव्हाण, महाविद्यालयाचे प्रभारी संचालक सुभाष लहाने, विभागप्रमुख डॉ. सत्यवान धोंडगे, डॉ. गजेंद्र गंधे, डॉ. सचिन बोरसे, डॉ. सुगंधा असोदेकर, डॉ. शोएब शेख, डॉ. रुपेश रेब्बा, प्रा. संजय कल्याणकर, डॉ. राजेश औटी, श्री. अच्युत भोसले, अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.